औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाटचे विभागस्तरीय तंत्र प्रदर्शनात नेत्रदिपक यश…

⚡सावंतवाडी ता.२६-: मुंबई विभागीय तंत्र प्रदर्शन २०२४-२५ हे औद्योगिक प्रशिक्षण संस्था डॉनबोक्स्को,कुर्ला येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाटने प्रथम क्रमांक मिळवत सिंधुदुर्ग जिल्हाच्या विकासात मानाचा तुरा रोवला आहे.

सदर प्रदर्शनासाठी मुंबई विभागाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगड, पालघर आणि ठाणे जिल्हामधून एकूण 53 प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. या मधील उत्कृष्ट १० प्रतिकृतींची निवड राज्यस्थरीय तंत्र प्रदर्शनासाठी करण्यात आली. यामधील औ.प्र.संस्था फोंडाघाट च्या “स्मार्ट-रोड सेफ्टी” या प्रतिकृतीला विभागस्थरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला. यावेळी मा. सहसंचालक निकम साहेब तसेच औ.प्र.संस्था डॉनबोक्स्को चे प्राचार्य यांच्यामार्फत सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. या प्रतिकृतीसाठी मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिशियन अँड इलेक्ट्रॉनिक्स या व्यवसायाचे शिल्प निदेशक श्री.स्वप्निल विश्वंभरे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या यशाबद्दल जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख अधिकारी मा.श्री.मोहारे साहेब तसेच औ.प्र.संस्था फोंडाघाट चे प्राचार्य भूषण सोनवणे तसेच सर्व संस्था कर्मचारी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी, निदेशक, गटनिदेशक यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page