⚡मालवण ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्यावतीने डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे
या परीक्षेत इयत्ता पाचवी मधील आदित्य देविदास हारगिले आणि वैष्णवी विश्वनाथ आंबेरकर तसेच इयत्ता आठवी मधील प्रथमेश प्रमोद चव्हाण यांनी सर्वोत्तम गुण संपादन केल्याने हे तीनही विद्यार्थी संबोध परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक एच बी तिवले तसेच सहायक शिक्षिका पूनम मेस्त्री मॅडम, सहाय्यक शिक्षिका अस्मिता वाईरकर यांचे मार्गदर्शन लाभले यांच्या या यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे अध्यक्ष श्री विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर काँसिल ऑफ मॅनेजमेंट चे चेअरमन सुधीर हेरेकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत यांनी अभिनंदन केले आहे
