⚡मालवण ता.२५-:
ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण तर्फे महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धा – रन फॉर हेल्थ चे आयोजन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि.९ मार्च रोजी मालवण येथे करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिलांसाठीची मॅरेथॉन स्पर्धा असलेल्या या स्पर्धेचे यावर्षी तिसरे वर्ष आहे.
ही स्पर्धा विनामूल्य असून फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १०ते १५ वर्षे वयोगट(२ किमी ), १६ ते २५ वयोगट(२ किमी ), २६ ते ३५ वयोगट(२किमी ), ३६ ते ४५ (२ किमी ), ४६ ते ५५ (चालणे, धावणे दोन्ही ग्राह्य असेल- २ किमी), ५६ वर्षा पुढील महिला – चालणे,धावणे दोन्ही ग्राह्य असेल- २ किमी) अशा सहा गटात घेण्यात येणार आहे.
दि. ९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता ही सुरु स्पर्धा होणार आहे. रिपोर्टींग टाईम सकाळी ६.३० वाजता असेल.
या मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग मालवण देऊळवाडा सागरी महामार्ग ते कोळंब पुल असा आहे. स्पर्धकांनी स्वतःच्या जबाबदारीवर स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा. प्रत्येक गटासाठी -प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांक काढले जातील आणि या प्रथम पाच महिलांना आकर्षक चषक, मेडल व सन्मानपत्र असे पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व मेडल दिले जाईल. नियम, अटी व अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी राधा केरकर- 9021163580, नेहा कोळंबकर- 9404920366, समृद्धी धुरी, अनुष्का चव्हाण, पल्लवी खानोलकर, सुविधा तिनईकर, कविता वेंगुर्लेकर, वैशाली शंकरदास, कोमल चव्हाण, सिद्धी बांदेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
