Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ एमआयडीसी रस्ता काम संदर्भात गरिबांवर होतोय अन्याय…

गरिबाला एक न्याय तर धडग्यांना दुसरा न्याय खपवून घेणार नाही:एमआयडीसी अधिकारी श्री. रेवंडकर यांना घेराव घालत मनसेचा इशारा.. कुडाळ : मुंबई गोवा हायवे ते गवळदेव मार्गे एमआयडीसी रस्ता काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम करताना गरिबाला एक न्याय आणि धनदांडग्यांना दुसरा न्याय हे खपवून घेणार नाही. रस्ता कामात आडव्या येत असलेल्या त्या हॉटेलची भिंत…

Read Full News

यंदाचा आरती प्रभू पुरस्कार नाटककार प्रशांत दळवी यांना जाहीर…

बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या वतीने दिला जातो पुरस्कार:पत्रकार परिषदेत केदार सामंत यांनी दिली माहिती. ⚡कुडाळ ता.२७-: कुडाळ मधील बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आरती प्रभू पुरस्कार यावर्षी मुंबई येथील प्रसिध्द नाटककार प्रशांत दळवी यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण…

Read Full News

१ मार्च ला मळगावात मोफत ‘छावा’ चित्रपट…

भिल्लवाडी गृप आणि मळगाव ग्रामस्थ यांच्याकडून खास एलईडी स्क्रिनद्वारे चित्रपटाचे आयोजन… ⚡सावंतवाडी ता.२७-: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट छावा प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विकी कौशल व तेलगू अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर राज्यांत प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचवा या…

Read Full News

आंगणेवाडीच्या भक्तांना सोयी सुविधा मिळवून देणे हे आमचे कर्तव्य…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे:ना. शिंदे यांनी आंगणेवाडीत घेतले भराडी देवीचे दर्शन.. ⚡मालवण ता.२६-:आंगणेवाडी यात्रेला भराडी देवीच्या दर्शनाला मला यायचे होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कार्यक्रम असल्याने मी येऊ शकलो नाही. मात्र देवीचे दर्शन होणारच होते ते आज झाले. कुणकेश्वर आणि व आंगणेवाडी असे दोन्हीचे दर्शन झाले. आंगणेवाडी हे महाराष्ट्र व बाहेरच्या लोकांचे श्रद्धास्थान आहे….

Read Full News

बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्यावतीने वंदना घाणेकर व विजय चौकेकर विशेष पुरस्काराने सन्मानित…

⚡मालवण ता.२६-:बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टाच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून निरामय केंद्र कोलगावच्या सचिव वंदना घाणेकर याना बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेविका पुरस्कारव संजय नाईक स्मृति आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार विजय चौकेकर याना प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. मालवण तालुक्यातील कट्टा येथील बॅ नाथ पै सेवांगण शाखेच्यावतीने शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात…

Read Full News

व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रा. रूपेश पाटील यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.२६-: महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि जगातील तब्बल ४१ पेक्षा अधिक देशात कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित आणि पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रा. रूपेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात ‘व्हाइस ऑफ…

Read Full News

कणकवलीत ८ मार्च रोजी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा…

कणकवलीत ८ मार्च रोजी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा.. ⚡कणकवली ता.२६-: शहरातील सुतारवाडी येथील विश्वकर्मा मित्रमंडळातर्फे शनिवार ८ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता श्री देव स्वयंभू मंदिर मार्गावरील निमेवाडी येथील मैदानावर भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे २० हजार, १५ हजार, १० हजार, ७ हजार, ५ हजार, ३ हजार तसेच…

Read Full News

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते कुणकेश्वर मंदिरात पहिली पूजा…

⚡कुणकेश्वर दि.२६-: दक्षिण कोकणची काशी अशी श्री क्षेत्र कुणकेश्वर ची ओळख आहे. आजपासून या श्री क्षेत्र कुणकेश्वर जत्रोत्सवला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते आज पहाटे येथील मंदिरात प्रथम पूजा करण्यात आली. यावेळी ना. नितेश राणे कुणकेश्वर चरणी लीन झाले.

Read Full News

कुडाळ मधून होणारी अवैध दारू गुटखा वाहतूक रोखा…

मनसेचे एक्साइज विभागाला निवेदन:वाहतूक बंद न झाल्यास आंदोलन.. ⚡कुडाळ ता.२६-: गोवा राज्यातून कुडाळ मार्गे होणारी अवैध दारू व गुटख्याची वाहतूक रोखावी असे निवेदन महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात अवैद्य वाहतुकीवर कडक स्वरूपाची कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाहेर घंटांनाद…

Read Full News

प्रतीक कोतवाल यांना भारत बिजनेस अचीवर अवॉर्ड्स 2025 प्रदान…

अभिनेत्री अमृता राव, सीईओ साबे यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण.. ⚡कणकवली ता.२६-: कणकवली शहरातील इंजिनिअर प्रतीक खंडेराव कोतवाल यांना स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया प्राईम टायकून मीडिया व टेक एलएलपी यांच्या वतीने बेस्ट कस्टमर सर्व्हिस अवॉर्ड इन मल्टी सर्व्हिसेस पुरस्कार पणजी गोवा येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आणिस्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाचे सीईओ…

Read Full News

You cannot copy content of this page