बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्यावतीने वंदना घाणेकर व विजय चौकेकर विशेष पुरस्काराने सन्मानित…

⚡मालवण ता.२६-:
बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टाच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून निरामय केंद्र कोलगावच्या सचिव वंदना घाणेकर याना बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेविका पुरस्कार
व संजय नाईक स्मृति आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार विजय चौकेकर याना प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

मालवण तालुक्यातील कट्टा येथील बॅ नाथ पै सेवांगण शाखेच्यावतीने शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी सेवांगणचे अध्यक्ष ॲड देवदत्त परुळेकर, दीपक भोगटे, वंदना घाणेकर, विजय चौकेकर, रश्मी पाटील, प्रसाद घाणेकर, विकास म्हाडगुत, बापू तळावडेकर, गीता नाईक, सौ. नाईक, वीणा म्हाडगुत, भाट सर, संध्या म्हाडगुत, महेश नाईक, ॲड राजीव बिले, चांदरकर सर, पेंडूरकर सर, अर्जून पेंडूरकर, भारत पेंडूरकर, परब, आवळेगावकर, काळसेकर, विद्या चिंदरकर, जांभवडेकर मॅडम, मंदार सांबारी, सकपाळ सर, कृष्णा पाताडे, आकेरकर सर, सदानंद कांबळी, गुरुनाथ ताम्हणकर, अनिल माळवदे, तेजल ताम्हणकर, कथामालेचे कार्यकर्ते शिक्षक पालक उपस्थित होते प्रारंभी दीपक भोगटे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले

यावेळी सत्कारमूर्ती वंदना घाणेकर यानी १० वीत असताना बाबा आमटे यांच्यावरील आनंदवन हा धडा वाचल्यावर समाजसेवेची आवड निर्माण झाली. तसेच कट्टा येथे राहात असताना बापूभाईच्या देखण्या आणि सेवाभावी व्यक्तिमत्वाने आपण भारावून गेले होते. निरामय केंद्राद्वारे विद्यार्थ्याना मदत करता आली याचे समाधान असल्याचे म्हटले. तर सत्कारमूर्ती विजय चौकेकर यानी आपल्या बालपणा पासून शिक्षक म्हणून सेवानिवृत होईपर्यंतचा प्रवास विशद केला. व यापुढे आपण अंधश्रद्धा निर्मूलन कामासाठी सर्वस्वाने वाहून घेणार असल्याचे सांगितले.

यावेळी महेश नाईक सेवांगणचे अध्यक्ष ॲड देवदत्त परुळेकर सुरेश ठाकूर, उन्मेष सावंत, उदय पंडित यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी कट्टा परिसरातील ५ गरीब मुलीना उन्मेष सावंत यांच्या माध्यमातून ग्रँट इन्स्ट्रमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CRS फंडातून सायकलचे वितरण करण्यात आले. तसेच वराडकर हायस्कूलच्या साने गुरुजी प्रश्नमंच स्पर्धेतील अव्वल क्रमाकांच्या मुलीना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी लाड तर आभार बाळ नांदोसकर यांनी मानले.

You cannot copy content of this page