Headlines

Global Maharashtra Breaking News

अवैद्यरित्या मद्याची वाहतूक करताना सावंतवाडीतील एक ताब्यात…

इन्सुली राज्य उत्पादनशुल्क पथकाची कारवाई: १६ लाख २० हजारचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता.०७-: पत्रादेवी -बांदा रोड एका धाब्याजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना एकावर कारवाई करण्यात आली असून यात तब्बल 16,20,840 रुपये किमतीचामुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी वाहन चालक शुभम शितोळे (वय 27) रा. सावंतवाडी…

Read More

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांना पितृशोक…

⚡सावंतवाडी ता.०५-: वेत्ये सरंपच गुणाजी गावडे यांचे वडील तथा वेत्ये माजी माजी सरपंच अर्जुन गुणाजी गावडे (वय 73) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात बायको,भावू,मुलगा, सुन ,दोन मुली , नातवंड असा परिवार आहे.

Read More

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच कणकवलीत जल्लोष…!

⚡कणकवली ता.०५-: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची यांनी शपथ घेताच कणकवलीत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही शपथ घेतली. यामुळे कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांकडुन जोरदार घोषणाबाजी करत, पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला. महायुतीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्र फडणवीस साहेब आगे हम…

Read More

मालवणातील स्वीमिंग स्पर्धेत स्थानिक स्पर्धकांना फी मध्ये सूट मिळावी…

शिल्पा खोत यांची प्रशासनाकडे मागणी.. ⚡मालवण ता.०५-: मालवणमध्ये चिवला बीच येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्वीमिंग स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्थानिक स्पर्धकांना फी मध्ये सूट मिळावी, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे व मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांना दिले आहे. मालवणमध्ये चिवला बीच येथे पोहण्याच्या स्पर्धा (स्विमिंग कॉम्पिटिशन) आयोजित…

Read More

ओरोस येथे उद्या’शिक्षकांसाठी सानेगुरुजी’ व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन…

⚡मालवण ता.०५-: शिक्षक भारती सिंधुदुर्ग (प्राथमिक/माध्यमिक) आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने “शिक्षकांसाठी सानेगुरुजी” या विशेष व्याख्यानाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी मर्यादित सभागृह, सिंधुदुर्गनगरी – ओरोस येथे शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी १०. ३० वा. करण्यात आले आहे. या व्याख्यान कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, व्याख्याते व साने…

Read More

वराडकर हायस्कूल कट्टाच्या कुमारी श्रेया चांदरकर हिची राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेसाठी निवड…

मालवण दि प्रतिनिधीपुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत त्रिमित शिल्प या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेल्यावराडकर हायस्कूल कट्टाची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिची राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेसाठी निवड झाली असून दि ३ जानेवारी ते ७ जानेवारी २०२५ या कालावधीत भोपाळ ,मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत सलग…

Read More

ईव्हीएम विरोधात काँग्रेसची आजपासून सह्यांची मोहीम…

बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी:सुमारे ५० हजार सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार.. कुडाळ : कोणत्याही प्रकारची लाट नसताना आणि लोकसभा निआवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले लोकमत असताना या विधानसभा निवडणुकीतील निकाल हे धक्कादायक आहेत. २६ नोव्हेंबरला संविधान दिनादिवशी यावर राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांनी लोकांच्या वतीने संशय देखील व्यक्त केला आहे. त्यामुळे या पुढच्या सर्व…

Read More

मळगाव येथील भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या…

सावंतवाडी : मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शुक्रवार ६ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळी मंदिरात विविध धार्मिक विधी, अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे – फेडणे, तसेच ईठला देवीची ओटी भरणे, देवीला कोंबडा अर्पण करणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ढोलांच्या गजरात तरंगासहीत पालखी मिरवणूक…

Read More

खर्डेकर महाविद्यालयात “सायबर गुन्हे व आपली सामाजिक जबाबदारी” चर्चासत्र संपन्न…

⚡वेंगुर्ले ता.०५-: बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला ,पोलीस ठाणे वेंगुर्ला, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, जिमखाना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर गुन्हे आणि आपली सामाजिक जबाबदारी” याविषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर अभ्यासासाठी काळजीपूर्वक…

Read More

बांदा शहराला दुपारी अवकाळी पावसाने झोडपले…

⚡बांदा ता.०५-: बांदा शहराला आज दुपारी अचानक मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक पाऊस कोसळल्याने बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांसह शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सुमारे तासभर पाऊस सुरु होता

Read More
You cannot copy content of this page