मालवण ग्रामीण रुग्णालयाला लवकरच स्त्री-रोग तज्ञ मिळणार…

⚡मालवण ता.१४-:
मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने महिला रुग्णांना तसेच गरोदर स्त्रियांना उपचारासाठी समस्या निर्माण होत होत्या. अनेक वर्षापासून ही समस्या कायम आहे. याबाबत नागरिकानी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर आमदार राणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केली असता मालवण ग्रामीण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ज्ञ नियुक्ती बाबत निर्णय घेण्यात आला आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ आठवड्यातून दोन ते तीन दिवस मालवण ग्रामीण रुग्णालयात सेवेत असणार आहेत. याबाबतचे आदेशपत्र दोन दिवसात प्राप्त होणार आहे

मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ कायमस्वरूपी मिळावी तसेच ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा व अन्य समस्याही आमदार निलेश राणे आरोग्य मंत्र्यांच्या माध्यमातून सोडवतील. त्याबाबत आमदार यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु असल्याचे भाजप मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page