राज्यस्तरीय इंग्लिश ग्रामर परीक्षेत भरतगड इंग्लिश मीडियमच्या स्वराज चव्हाण आणि वंशिका खोत राज्यात तिसऱ्या…

मालवण दि प्रतिनिधी

महाराष्ट्र मुंबई परिक्षा मंडळ मुंबई आयोजित राज्यस्तरीय इंग्लिश ग्रामर परीक्षा 2024-25 मध्ये भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मसुरे मर्डे या प्रशालेचे विद्यार्थी कुमार स्वराज सुरेश चव्हाण याने ग्रुप बी इयत्ता तिसरी व चौथी या गटातून 100पैकी 96 मार्क्स व कुमारी वंशिका निलेश खोत ग्रुप सी इयत्ता पाचवी ते सातवी या गटातून 100 पैकी 93 मार्क्स मिळवत राज्यात तिसऱ्या क्रमांक प्राप्त केला आहे . याबाबत सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

शाळेत एकूण 55 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षिका म्हणून सिद्धी मेस्त्री, रसिका मेस्त्री,सिस्टर कांता, स्टेला लोबो, स्वरांजली ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. याबाबत सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्था अध्यक्ष प्रकाश परब , स्कूल कमिटी चेअरमन संग्राम प्रभूगावकर संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page