वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला शाळा नं.३मधील इयत्ता चौथीचा विद्यार्थी कु. रेयांश संदिप कोळसुलकर याने सिधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये २०० पैकी १८२ गुण मिळवून मेडलसहित वेंगुर्ला तालुक्यात प्रथम आला आहे. तसेच त्याने गुणवत्ता यादीत सिधुदुर्ग टॉपटेन ५ मध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. इस्त्रो (बेंगलोर) सफरीसाठी तो पात्र ठरला आहे.
या परीक्षेव्यतिरिक्त त्याने डॉ.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत ३०० पैकी २६४ गुण मिळवून तसेच ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत १०० पैकी ९० गुण मिळवून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम आला आहे. गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत त्याने ३०० पैकी २४४ गुण मिळविले आहेत. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्वस्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.
फोटो – रेयांश कोळसुलकर
