सिंधदुर्गामध्ये विविध सरकारी रूग्णालयांमध्ये मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर…

⚡वेंगुर्ला ता.१६-: अथायु हॉस्पिटल कोल्हापूर व सिंधुदुर्गातील विविध सरकारी रूग्णालयाच्यावतीने दि. २० रोजी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत शिरोडा येथे व दुपारी ३ ते ५ पर्यंत वेंगुर्ला येथे तसेच २१ रोजी सकाळी ११ ते १ या कालावधीत मालवण येथील सरकारी रूग्णालयांमध्ये मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर आयोजित केले आहे.

  या शिबिरात मोफत हृदयविकार, अँजिओग्राफी,  पित्ताशात खडे,  मुतखडा, प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी, व्हेरिकोज व्हेन्स, मणका तपासणी होणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयाचे व्हॉल्व बदलणे, दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट, दुर्बिणीद्वारे पित्ताशाचे खडे, हाडाचे फ्रॅक्चर, सर्व प्रकारचे कॅन्सर, केमोथेरपी, डायलेसीस, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार, वाढलेली थायरॉईडगाठी वर मायक्रोवेव द्वारे (विना ऑपरेशन) अत्याधुनिक उपचार, विना टाके गर्भाशयगाठीवर उपचार, पायांची प्ररिफरल अँजिओप्लास्टी (मधुमेहामुळे पायाला झालेली इजा), प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशन हे उपचार सर्व रेशनकार्ड व आधारकार्ड धारकांना मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहेत. तसेच हॅर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, फिशर, फिस्टुला मणका, गुढघे व खुबा प्रत्यारोपण ह्या विषयी मार्गदशन करण्यात येणार आहे. शिबीरादिवशी ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी मोफत होणार असून नाव नोंदणीसाठी ८९२८७३६९९९ ह्या नंबर संफ करावा. तरी जास्तीत जास्त सिंधदुर्ग जिल्ह्यामधील रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मार्फत करण्यात आले आहे.
You cannot copy content of this page