Headlines

‘विकास’ संस्था वालावलच्या चेअरमनपदी दयानंद चौधरी…

कुडाळ ता.१५-: विविध कार्यकारी संस्था वालावल च्या दर पाच वर्षांनी येणाऱ्या या संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडून, दयानंद महादेव चौधरी यांच्यासह विठ्ठल वसंत आडेकर, सुमन वसंत बंगे, आनंद श्रीधर चौधरी, गंगाराम मधुकर रेडकर, संदीप मधुसूदन साळस्कर, वासुदेव शंकर वालावलकर, प्रिया रामचंद्र वालावलकर, अश्विनी सखाराम मटकर व अपर्णा अजय सावे, हे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून दयानंद चौधरी यांनी अथक प्रयत्न केले. शासकीय अधिकारी विक्रांत आरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची प्रथम सभा पार पडली व दयानंद चौधरी यांची अध्यक्षपदी तर प्रिया हेमचंद्र वालावलकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
चौधरी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व कार्यकारिणी सदस्यांचे आभार मानले. नूतन कार्यक्ररिणीस मार्गदर्शन करताना चौधरी यांनी सांगितले की, संस्थेच्या आर्थिक उन्नती करिता संस्थेमार्फत आपण जवळजवळ 150 छोटे-मोठे उद्योग करू शकतो. या उद्योगाच्या माध्यमातून संस्थेचा आर्थिक पाया भक्कम करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. संस्थेची स्वतःची इमारत नसल्याकारणाने ती इमारत होण्याकरिता शासकीय माध्यमातून निधी उपलब्ध करणेबाबत आपण प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. विक्रांत आरेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, निवडणूक प्रक्रियेतून कार्यकारिणीची निवड करावी लागली असती तर, संस्थेस जवळपास एक लाख ते सव्वा लाख निवडणूक प्रक्रियेवर खर्च करावे लागले असते, परंतु दयानंद चौधरी यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याकरता प्रयत्न केल्याने संस्थेचे हे पैसे वाचलेले आहेत, याकरिता मी त्यांना धन्यवाद देतो. शेवटी त्यांनी संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत आश्वासित केले. विक्रांत आरेकर यांनी सर्व कार्यकारिणी सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page
16:41