Headlines

अमित धुरी कुटुंबीयांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन…

कुडाळ : तालुक्यात वसोली येथील कॉजवेवर पुराच्या पाण्यात वाहून दुखद निधन झालेल्या माणगाव येथील अमित मोहन धुरी यांच्या घरी माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन धुरी कुटुंबीयांचे सात्वन करत कुटुंबियांना धीर दिला.यावेळी शिवसेना माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, माजी पं. स. सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, माणगाव उपसरपंच बापू बागवे, युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी,…

Read Full News

आजच्या तरुण पिढीने शाहू महाराजांचा वैचारिक व कृतिशील वारसा पुढे चालवत सामाजिक न्यायचा जागर करायला हवा…

प्रा.डाॅ.एम.एन.वालावलकर ; गोगटे वाळके महाविद्यालयात शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी.. ⚡बांदा ता.२७-: सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे लोकराजा म्हणून राजषीॅ छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख गौरवाने करावा लागेल, राजवैभवाचा गाजावाजा न करता रयतेच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारे छत्रपती शाहूमहाराज समाजासमोर आदर्श आहेत. कला, संस्कृती, क्रीडा , शिक्षण व कृषीविषयक जाणीवा यांना राजाश्रय देऊन…

Read Full News

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर ‘वाढदिवस केला साजरा…!

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज २७ जून रोजी १० वर्षे पूर्ण होऊन देखील ते अदृश्य असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर ‘वाढदिवस साजरा केला. साखर वाटत, भुमिपुजन दगडाचा केक कापून गांधीगिरीने याचा निषेध नोंदविण्यात आला. सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार…

Read Full News

दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुण्यातील चालक ताब्यात…

बांदा/प्रतिनिधीभरधाव वेगात मोटर चालून दुचाकीस्वार उत्तम दत्ताराम पडवळ यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटार चालक राहुल शरद कुबल (वय ४०, रा. पुणे) याला बांदा पोलिसांच्या पथकाने पुणे-बाणेर येथून आज अटक करण्यात आले. तसेच त्याची अपघातग्रस्त डस्टर मोटार (एमएच १२ जीएम २८०९) ताब्यात घेण्यात आली. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर सटमटवाडी येथे २७ एप्रिल रोजी झाला होता.या…

Read Full News

विविध सामाजिक संघटनांकडून मालवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचा सत्कार…

मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील मातृत्व आधार फाऊंडेशन ,स्वराज्य संघटना, वाईल्डलाईफ रेस्क्यूलर सिंधुदुर्ग, यशराज प्रेरणा आचरा, कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवण पोलीस ठाण्यातून बदली झालेले पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचा बुधवारी हृद्य सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. मालवण येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रवीण कोल्हे यांनी गेल्या…

Read Full News

व्ही एन नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी…

⚡बांदा ता.२६-: येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई म्हणाल्या, इतिहासाचे आपल्या जीवनात फार महत्व आहे. इतिहासामुळे आपल्याला भूतकाळातील घटना, परंपरा, संस्कृती आणि जीवनशैलींची माहिती मिळते. या ज्ञानामुळे आपण वर्तमानाचे संदर्भ…

Read Full News

धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात हरीनाम सप्ताह व वारकरी दिंडी चित्ररथ भजनाचे आयोजन…

⚡मालवण ता.२६-:मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात दि. ५ ते १२ जुलै या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताह होणार असून या साप्ताहात दररोज वारकरी दिंडी चित्ररथ भजन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ५ जुलै रोजी रात्री १० वा. श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, किर्लोस गावठणवाडी, दि. ६ रोजी रात्री १० वा. श्री देव जैन रामेश्वर प्रासादिक…

Read Full News

काका कुडाळकर यांच्याकडे समता परिषदेच्या समन्वयक पदाची जबाबदारी…

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग साठी करणार काम:जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह होण्यासाठी प्रयत्न करणार.. ⚡कुडाळ ता.२६-: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष ना.छगन भुजबळ यांनी आपल्यावर सिंधुदुर्ग – रत्नागिरी या दोन जिल्ह्याच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली आहे. समता परिषद हि राजकीय पक्ष विरहित परिषद आहे. या परिषदेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील ओबीसी आणि…

Read Full News

कॅप्टन दत्ताराम शिर्के यांचे निधन …!

⚡मालवण ता.२६-:कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथील सेवानिवृत्त सैनिक कॅप्टन दत्ताराम लक्ष्मण शिर्के यांचे बुधवारी पहाटे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. सैनिक म्हणून दत्ताराम शिर्के यांनी ३२ वर्षे देशाच्या कानाकोपऱ्यात उल्लेखनीय कामगिरी केली. देशसेवा करत असताना त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात उत्तम कामगिरी केली. या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना दोन वेळा युद्ध सेवापदक देऊन सन्मानित करण्यात…

Read Full News

आचरा पोलीसांकडून जागृती फेरीतून केली अमली पदार्थ विरोधी जनजागृती…

⚡मालवण ता.२६-:नशामुक्त भारत सशक्त भारत,नशा सोडा प्रगती करा अशा घोषणांनी आचरा तीठा परीसर निनादून गेला होता.आचरा आठवडा बाजाराचे औचित्य साधून आचरा पोलीसांतर्फे आचरा हायस्कूल ते बाजारपेठ दरम्यान जनजागृती फेरीचे आयोजन करत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली होती ‌यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांनी उपस्थितांना अमली पदार्थ सेवनाने होणा-या दुष्परिणामाबाबत माहिती देत…

Read Full News

You cannot copy content of this page