धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात हरीनाम सप्ताह व वारकरी दिंडी चित्ररथ भजनाचे आयोजन…

⚡मालवण ता.२६-:
मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात दि. ५ ते १२ जुलै या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताह होणार असून या साप्ताहात दररोज वारकरी दिंडी चित्ररथ भजन आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये ५ जुलै रोजी रात्री १० वा. श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, किर्लोस गावठणवाडी, दि. ६ रोजी रात्री १० वा. श्री देव जैन रामेश्वर प्रासादिक दिंडी भजन मंडळ, चुनवरे, ७ रोजी रात्री ८. ३० वा. ओम साई भजन मंडळ भांडुप (पूर्व), ८ रोजी रात्री १० वा. श्री विठ्ठल रखुमाई दिंडी भजन मंडळ आचरा देऊळवाडी, ९ रोजी रात्री १० वा. आई भगवती कला दिंडी भजन मंडळ तोरसोळे- देवगड, १० रोजी रात्री १० वा. भवानी जंक्शन वारकरी दिंडी पथक, दाभोळे राऊतवाडी, देवगड, ११ रोजी सायं. ६ वा. एकात्मिक विकास मंडळ मोर्वे- देवगड, रात्री १० वा. श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा ग्रामस्थ यांचे चित्ररथ देखाव्यासहित ढोल ताशांच्या गजरात वारकरी दिंडी भजन होणार आहे.

तसेच दि. १२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत गोपाळकाला होणार आहे. तर दि. १५ जुलै रोजी दुपारी १ वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page