व्ही एन नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी…

⚡बांदा ता.२६-: येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई म्हणाल्या, इतिहासाचे आपल्या जीवनात फार महत्व आहे. इतिहासामुळे आपल्याला भूतकाळातील घटना, परंपरा, संस्कृती आणि जीवनशैलींची माहिती मिळते. या ज्ञानामुळे आपण वर्तमानाचे संदर्भ समजून घेऊ शकतो आणि भविष्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतो. इतिहास आपल्याला भूतकाळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना, त्यावेळची सामाजिक रचना, रीतिरिवाज आणि संस्कृतीची माहिती देतो. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी अथक प्रयत्न केलेत.
यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा नाबर शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करताना मान्यवर.

You cannot copy content of this page