कॅप्टन दत्ताराम शिर्के यांचे निधन …!

⚡मालवण ता.२६-:
कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथील सेवानिवृत्त सैनिक कॅप्टन दत्ताराम लक्ष्मण शिर्के यांचे बुधवारी पहाटे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

सैनिक म्हणून दत्ताराम शिर्के यांनी ३२ वर्षे देशाच्या कानाकोपऱ्यात उल्लेखनीय कामगिरी केली. देशसेवा करत असताना त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात उत्तम कामगिरी केली. या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना दोन वेळा युद्ध सेवापदक देऊन सन्मानित करण्यात आले. सेवाकाळात लेफ्टनंट पद आणि सेवानिवृत्त नंतर कॅप्टन पद देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, नात, नातू असा परिवार आहे. सध्या लडाख येथे लष्करात सेवा बजावणाऱ्या प्रथमेश पंढरीनाथ शिर्के यांचे ते आजोबा होत

You cannot copy content of this page