आचरा पोलीसांकडून जागृती फेरीतून केली अमली पदार्थ विरोधी जनजागृती…

⚡मालवण ता.२६-:
नशामुक्त भारत सशक्त भारत,नशा सोडा प्रगती करा अशा घोषणांनी आचरा तीठा परीसर निनादून गेला होता.आचरा आठवडा बाजाराचे औचित्य साधून आचरा पोलीसांतर्फे आचरा हायस्कूल ते बाजारपेठ दरम्यान जनजागृती फेरीचे आयोजन करत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली होती

‌यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांनी उपस्थितांना अमली पदार्थ सेवनाने होणा-या दुष्परिणामाबाबत माहिती देत मार्गदर्शन केले.तसेच आचरा तिठा येथे “अंमली पदार्थ मुक्ती शपथ देण्यात आली.

यावेळी पोलीस कर्मचारी मिलिंद परब, सुदेश तांबे,मनोज पुजारे, स्वाती आचरेकर,विशाल वैजल, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,विद्यानंद परब, मंदार सरजोशी, ग्रामपंचायत सदस्या तारी,न्यू इंग्लिश स्कूल आचराचे मुख्याध्यापक गोपाळ परब,उप मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे, इतर शिक्षक, विद्यार्थी, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, सुनील खरात,अमोल पेडणेकर, महेश तांडेल यांच्या सह ग्रामस्थ आदी उपस्थित होते,

You cannot copy content of this page