दिर्बादेवी जामसंडे देवगड संघ ठरला भालचंद्र चषक २०२५’ कबड्डी स्पर्धेचा मानकरी…
कणकवली : भालचंद्र मित्रमंडळ कणकवली यांच्यावतीने विद्यामंदिर प्रशालेच्या पटांगणावर ‘भालचंद्र चषक २०२५’ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अंतिम सामना दिर्बादेवी जामसंडे देवगड विरुद्ध यंगस्टार कणकवली संघ यांच्यात झाला. यात दिर्बादेवी जामसंडे देवगड संघाने यंगस्टार कणकवली संघाचा पराभव करत भालचंद्र चषकावर नाव कोरले. स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक भद्रकाली गुढीपुर संघाने पटकावले…
