मेढा येथील मुरलीधर मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन…

⚡मालवण ता.१०-:
मालवण मेढा येथील श्री देव मुरलीधर मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी साजरा होणार असून यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त दि. ९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वा. श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ वरची देवली – बुवा महेश नाईक यांचे भजन सादर झाले. दि. १० रोजी रात्री ८ वा. अष्टपैलू कलानिकेतन प्रस्तुत भक्तीरंग गायनाचा कार्यक्रम, दि. ११ रोजी ८ वा. श्री देव शंकर मंदिर मेढा येथील महिला वारकरी दिंडी भजन मंडळाचे दिंडी भजन, दि. १२ रात्री १० वा. रोजी घुमडाई प्रासादिक भजन मंडळ, घुमडे यांचे भजन, दि. १३ रोजी रात्री ८ वा. श्री मोबारेश्वर वारकरी संगीत भजन देवबाग (बुवा योगेश राऊळ) यांचे भजन, दि. १४ रोजी रात्री ८ वा. ह.भ.प. महेश धामापूरकर यांचे कीर्तन होणार आहे. दि. ९ ते १४ ऑगस्ट पर्यंत दररोज सायंकाळी ७ वा. मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होणार आहे.

दि. १५ रोजी रात्री १०. ३० वा. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ह.भ.प. दर्शन वझे यांचे कीर्तन तसेच कृष्णजन्मानंतर रात्री १२. ३० वा. मुरलीधर मंदिर ते राम मंदिर पालखी सोहळा होणार आहे. दि.१६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद, दि. १७ रोजी सायंकाळी ४ वा. दहीहंडी (दहीकाला) होणार आहे व त्यानंतर सायंकाळी ५ वा. मालवण बाजारपेठ मार्गे मौनीनाथ मंदिर मेढा मार्गे पालखी सोहळा होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव मुरलीधर मंदिर व बालगोपाळ मित्रमंडळ, मेढा- मालवण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page