Headlines

स. का. पाटील सिंधुदुर्ग कॉलेजच्या विनायक मानवर याची इंडियन नेव्हीमध्ये निवड…

⚡मालवण ता.२०-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) विभागाअंतर्गत एनसीसी ट्रेनिंग घेतलेला तसेच टी.वाय.बी.एसी. या वर्गात शिक्षण घेतलेला एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर विनायक मानवर याची इंडियन नेव्ही अग्निवीर मध्ये निवड झाली. विनायक मानवर हा अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये वाढलेला मुलगा असून काम करत त्याने कॉलेज शिक्षण केले. सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी…

Read Full News

वेंगुर्ले न.प. निवडणुकिसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर : १० प्रभाग आणि असणार २० नगरसेवक…

हरकीत व सूचनांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत :मुख्याधिकारी.. ⚡वेंगुर्ले ता.२०-:वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुक २०२५ साठी नव्याने प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोग आणि विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०११ ची जनगनना विचारात घेऊन वेंगुर्ले शहरात दहा प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. दोन सदस्यीय प्रभाग निश्चीत करण्यात आले असून २० नगरसेवक संख्या असणार आहे.१७ नगरसेवक…

Read Full News

राष्ट्रीय स्तरावर गोव्याचा झेंडा फडकवणारा लहानसा चिमुकला सावंतवाडीचा सुपत्र…

दक्ष क्षितिज परबला हस्ताक्षर स्पर्धेत देशात ७ वा क्रमांक.. ⚡पणजी दि.२०-:पर्वरी (गोवा) : अक्षरांची ओळ, रेषांची जोड, आणि सुंदर हस्ताक्षराच्या कलेतून गोव्याच्या चिमुकल्या दक्ष क्षितिज परबने थेट राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे.विझ इंटरनॅशनल स्पेल बी अँड रायटींग विझर्ड आयोजित राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत दक्षने तब्बल ३ लाख स्पर्धकांमध्ये बाजी मारत ७ वा क्रमांक पटकावला. केवळ…

Read Full News

पावसाचा वेग मंदावला…

नद्यांची पाणी पातळी देखील झाली कमी:पाण्याखाली गेलेले रस्ते वाहतुकीस सुरू.. कणकवली : मागील चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत होता. अशातच सोमवार आणि मंगळवारी पावसाने हाहाकार माजवला होता. अनेक ठिकणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुले शहरी – ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी राज्य मार्ग देखील बंद होते. परिणामी जनजीवन…

Read Full News

बांद्यातील ऑटोमोबाईल गॅरेज मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडले…

3 हजार रुपये रोकड लांबविली:गेल्या तीन महिन्यात या गॅरेज मध्ये तिसऱ्यांदा चोरीची घटना घडली.. ⚡बांदा ता.२०-: बांदा कट्टा कॉर्नर चौकातील हायवेलगत असलेले राजू मळगावकर यांच्या मालकीचे राज ऑटोमोबाईल हे गॅरेज मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडून आतील सामनासाह 3 हजार रुपये रोकड लांबविली. गेल्या तीन महिन्यात याच गॅरेज मध्ये तिसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर चोरीच्या…

Read Full News

कृष्णा सावंत यांची शिवसेना पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती…!

⚡कुडाळ ता.२०-: वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी कृष्णा सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. नुकतेच माणगाव खोऱ्याच्या मेळाव्या दरम्यान कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी नियुक्त पत्र प्रदान केले या अगोदरही सावंत यांनी कुडाळ…

Read Full News

छायाचित्रकार म्हणजे बातमीला जिवंत करणारा कलाकार…

तहसीलदार श्रीधर पाटील:जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त सावंतवाडी पत्रकार संघातर्फे छायाचित्रकारांचा सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.१९-:बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा जपण्याच काम पत्रकारांसह छायाचित्रकारही करत आहेत. पत्रकार आणि छायाचित्रकार हे नातं श्रीकृष्ण अन् अर्जूनासारख आहे. बातमीला जिवंत करण्याचे काम छायाचित्रकार करीत असतो. कारण, छायाचित्रण ही फक्त एक कला नसून ती एक अशी भाषा आहे, जी शब्दांशिवाय अनेक गोष्टी व्यक्त करते….

Read Full News

कल्पकतेने फोटो काढणे हीच खरी फोटोग्राफी…

भगवान लोके यांचे प्रतिपादन : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कणकवलीत छायाचित्रांचे प्रदर्शन.. ⚡कणकवली ता.१९-: फ्रेंच तंत्रज्ञानातून19 ऑगस्ट 1839 रोजी फोटोग्राफी ही जगासमोर आली. आता फोटोग्राफीच्या क्षेत्रात आता आधुनिकता आली आहे. कल्पकतेने फोटो टिपणे हे खरी फोटोग्राफी आहे. सिंधुदुर्गातील फोटोग्राफरांनी कल्पकतेने जिल्ह्यातील पर्यटनास्थळे अन्य स्थळांची फोटो काढून ती जगासमोर आणली आहेत. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कणकवली तालुका फोटोग्राफर…

Read Full News

आम. निलेश राणे यांनी केली कुडाळ शहर पदाधिकाऱ्यांची निवड…

कुडाळ : कुडाळ शहराच्या शिवसेना पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यामध्ये उपशहर प्रमुख पदी चेतन पडते व प्रथमेश केळबाईकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच युवा सेना, महिला सेना यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली.कुडाळ एमाआयडीसी येथे कुडाळ शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी…

Read Full News

एसटीच्या ‘त्या’ नऊ कर्मचाऱ्यांवरील निलंबन कारवाई मागे…

सेवशक्ती संघर्ष संघाचा पाठपुरावा.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रा.प.महामंडळ विभागीय कार्यालयाकडून नऊ कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने निलंबित करण्यात आले होते. त्यासाठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष संदेश सावंत यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची योग्य ती दखल घेवून रा.प.महामंडळाचे महाव्यवस्थापक तसेच परिवहन मंत्री महोदय यांच्याशी चर्चा…

Read Full News

You cannot copy content of this page