Headlines

धुरीवाडा येथे आंब्याचे झाड कोसळून वीज वाहिन्यांचे नुकसान…

माजी नगरसेवक यतीन खोत यांच्यासह नागरिकांनी हटविले झाड.. ⚡मालवण ता.२०-:मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ ते साई मंदिर रस्त्यावर धुरीवाडा येथे रस्त्यालगतचे आंब्यांचे झाड पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. झाड कोसळून वीज वाहिन्या तुटल्याने वीज कंपनीचे नुकसान झाले. यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक, वीज कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी यांच्या सहकार्याने हे…

Read Full News

वराडकर हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ऍपचे वितरण…

⚡मालवण ता.२०-:कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय(संयुक्त) मध्ये रोटरी क्लब सेंट्रल कणकवली व कट्टा येथील प्रशालेतील १९८५ सालच्या बॅच चे माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासक्रम निवड आणि करिअर गायडन्स या संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आयडिअल स्टडी ॲपचे मोफत वितरण केले. यावेळी रोटरी क्लब सेंट्रल कणकवलीचे अध्यक्ष…

Read Full News

मंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

कणकवली : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी २१ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ना. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.१५ वा. अधिश निवासस्थान, जुहू येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ११.३० वा. छत्रपती शिवाजी…

Read Full News

भिरंवडेतील युवकाचा डेंग्यूने मृत्यू…

मुंबईत होता नोकरीला:गोवा बांबुळी रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन.. कणकवली : तालुक्यातील भिरंवडे कदमवाडी येथील गणेश सूरेश कदम या ( वय २५ ) या युवकाचा गोवा बांबुळी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बीएससी नर्सिंग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईतील खाजगी रूग्णालयात नोकरीला होता. ताप येत असल्यामुळे तपासणी अहवाल डेंग्यु पॉझिटिव्ह आल्याने तो उपचारासाठी गावी आला होता….

Read Full News

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू…

जिल्हा परिषदेसमोर भर पावसात आंदोलन सुरु:जिल्ह्यातील ७०० कर्मचारी आंदोलनात सहभागी,२२ ऑगस्ट पर्यंत आंदोलन राहणार सुरु.. कुडाळ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्तगत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांचे १४ मार्च २४ च्या शासन निर्णयानुसार नियमित शासन सेवेतील समायोजन अदयाप न केल्याने आणि इतर न्याय मागण्याबाबत विलंब होत असल्याने या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १९ ऑगस्ट पासून जिल्हा परिषद समोर…

Read Full News

मतदारसंघात रोजगार आणण्यासाठी मी प्रयत्न करणार…

विशाल परब:उद्यापासून पक्ष देईल ती जबाबदारी पुर्ण करेन,रॅलीच्या माध्यमातून ढोल पथकाच्या जयघोषात व फटाक्यांच्या आतिषबाजीत विशाल परब यांचे जंगी स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.२०-: माझ्या घरात मी पुन्हा सक्रिय झालो आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत सक्रीय होण्याच पत्र देण्यात आल‌ं. माझ्यासारख्या तरुण मुलाला सक्रीय होण्याची संधी पुन्हा पक्षानं दिली. त्यामुळे या मतदारसंघात…

Read Full News

पिंगुळी-पाट आणि पिंगुळी-मठ रस्ता कामात सा.बां. विभागाचा ३२ लाखाचा भ्रष्टाचार…

पूर्वी झालेल्या रस्त्यांवरच पुन्हा खर्च:ठाकरे सेनेचे अतुल बंगे यांचा पत्रकार परिषदेत आरोप ;कुडाळ उपअभियंत्यांची चौकशी करून ईडीची कारवाई करा.. कुडाळ : तालुक्यात पिंगुळी – पाट आणि पिंगुळी – मठ या रस्ता कामांत सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ उपविभागाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या दोन्ही रस्ता कामांवर पुन्हा खर्च करण्यात आला आहे. यात…

Read Full News

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभेतील भजनी मंडळांना मोफत साहित्य वाटप…

संदिप गावडे यांचा उपक्रम.. सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून याही वर्षी देखील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भजन मंडळांना मोफत भजन साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी इच्छूक भजन मंडळांनी भाजप मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन संदिप गावडे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. भजन साहित्य वाटपाचा कार्यक्रम २४ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून…

Read Full News

स. का. पाटील सिंधुदुर्ग कॉलेजच्या विनायक मानवर याची इंडियन नेव्हीमध्ये निवड…

⚡मालवण ता.२०-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) विभागाअंतर्गत एनसीसी ट्रेनिंग घेतलेला तसेच टी.वाय.बी.एसी. या वर्गात शिक्षण घेतलेला एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर विनायक मानवर याची इंडियन नेव्ही अग्निवीर मध्ये निवड झाली. विनायक मानवर हा अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये वाढलेला मुलगा असून काम करत त्याने कॉलेज शिक्षण केले. सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी…

Read Full News

वेंगुर्ले न.प. निवडणुकिसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर : १० प्रभाग आणि असणार २० नगरसेवक…

हरकीत व सूचनांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत :मुख्याधिकारी.. ⚡वेंगुर्ले ता.२०-:वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुक २०२५ साठी नव्याने प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोग आणि विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०११ ची जनगनना विचारात घेऊन वेंगुर्ले शहरात दहा प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. दोन सदस्यीय प्रभाग निश्चीत करण्यात आले असून २० नगरसेवक संख्या असणार आहे.१७ नगरसेवक…

Read Full News

You cannot copy content of this page