धुरीवाडा येथे आंब्याचे झाड कोसळून वीज वाहिन्यांचे नुकसान…

माजी नगरसेवक यतीन खोत यांच्यासह नागरिकांनी हटविले झाड..

⚡मालवण ता.२०-:
मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ ते साई मंदिर रस्त्यावर धुरीवाडा येथे रस्त्यालगतचे आंब्यांचे झाड पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. झाड कोसळून वीज वाहिन्या तुटल्याने वीज कंपनीचे नुकसान झाले. यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक, वीज कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी यांच्या सहकार्याने हे झाड हटविण्यात आले.

यावेळी मदतकार्यात अमन गोडावले, गणेश चेंदवणकर, श्री. पुजारे, अनिकेत आचरेकर, सुनील बागवे, शिल्पा खोत रिस्क्यू सदस्य स्वप्नील परुळेकर, सर्वेश बागवे, हेमंत जोशी, रवि तोंडवळकर, महेश कांबळी, सदाशिव सावंत, दिलीप पवार, आशिष खोत, अमित खोत, तसेच वीज कर्मचारी श्री. गोलतकर, श्री. बांदेकर, श्री. लुडबे आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page