वराडकर हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ऍपचे वितरण…

⚡मालवण ता.२०-:
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय(संयुक्त) मध्ये रोटरी क्लब सेंट्रल कणकवली व कट्टा येथील प्रशालेतील १९८५ सालच्या बॅच चे माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासक्रम निवड आणि करिअर गायडन्स या संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आयडिअल स्टडी ॲपचे मोफत वितरण केले.

यावेळी रोटरी क्लब सेंट्रल कणकवलीचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे म्हणाले, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय(संयुक्त) कट्टा ही ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नावाजलेली शाळा असून वराडकर हायस्कूलचे विद्यार्थी हे हिऱ्याप्रमाणे तेजस्वी आहेत. तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी व वकील ॲड.दीपक अंधारी यांनी ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ताही वाढवावी व प्रशालेचे नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवावे असे सांगत वाणिज्य शाखेतील तसेच विधी विषयक शिक्षणा मधील करिअरच्या संधी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सचिन मदने (असिस्टंट गव्हर्नर रोटरी क्लब कणकवली सेंट्रल) सौ. मेघा गांगण (माजी अध्यक्ष,रोटरी क्लब)यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सौ. प्रज्ञा प्रभाकर करावडे (सिनिअर कोर्डिनेटर ,कोटक एज्युकेशन फाऊंडेशन,मुंबई) यांनी प्रशालेचा इतिहास मांडला. रोटरी क्लब कणकवली सेंट्रल च्या सचिव सौ. सुप्रिया नलावडे यांनी विज्ञान शाखेमधील करिअरच्या संधीबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सचिन मदने, प्रशालेचे माजी विद्यार्थी सुभाष गावडे, प्रवीण गाड, सौ.पोरे या मान्यवरांचा सपत्नीक सत्कार मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे व पर्यवेक्षक श्री. महेश विठ्ठल भाट यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा च्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे यांनी प्रशालेबद्दल असणाऱ्या सहकार्याबद्दल १९८५ च्या माजी विद्यार्थी तसेच रोटरी क्लब कणकवली सेंट्रलचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वीणा शिरोडकर यांनी केले.

You cannot copy content of this page