सेवशक्ती संघर्ष संघाचा पाठपुरावा..
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रा.प.महामंडळ विभागीय कार्यालयाकडून नऊ कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने निलंबित करण्यात आले होते. त्यासाठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष संदेश सावंत यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची योग्य ती दखल घेवून रा.प.महामंडळाचे महाव्यवस्थापक तसेच परिवहन मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून आज रोजी १९/०८/२०२५ रोजी कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई ज्या अधिकाऱ्यांच्या सहीने करण्यात आली होती, त्याच अधिकाऱ्यांच्या सहीने मागे घेण्यात आली.
सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री मा.श्री नीतेशजी राणे साहेब व मा. श्री संदेशजी सावंत साहेब यांचे आभार मानण्यात आले. या आंदोलनात भाजप कामगार नेते अशोक राणे,विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर,जिल्हा भाजप सरचिटणीस बाळू देसाई,कुडाळ आगार कार्याध्यक्ष सुनील बांदेकर,अध्यक्ष दादा साईल, उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, कुडाळ आगार सल्लागार रुपेश कानडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
