बांद्यातील ऑटोमोबाईल गॅरेज मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडले…

3 हजार रुपये रोकड लांबविली:गेल्या तीन महिन्यात या गॅरेज मध्ये तिसऱ्यांदा चोरीची घटना घडली..

⚡बांदा ता.२०-: बांदा कट्टा कॉर्नर चौकातील हायवेलगत असलेले राजू मळगावकर यांच्या मालकीचे राज ऑटोमोबाईल हे गॅरेज मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडून आतील सामनासाह 3 हजार रुपये रोकड लांबविली. गेल्या तीन महिन्यात याच गॅरेज मध्ये तिसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर चोरीच्या घटनात वाढ झाल्याने पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केली आहे.

You cannot copy content of this page