Headlines

आरोस माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २२ पासून विविध कार्यक्रम…!

⚡सावंतवाडी ता.२०-: आरोस येथील श्री देवी माऊली मंदिरात सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार २२ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार २२ रोजी दुपारी १२ वाजता घटस्थापना,रात्री ७ वाजता आरती दिवे,आरास महिलांसाठी,त्यानंतर भजनाचा कार्यक्रम, मंगळवार २३ रोजी रात्री ७ वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी,रात्री ८ वाजता श्री देवी शर्वाणी दांडिया ग्रुप,पार्से गोवा समई नृत्य,श्री सातेरी महिला कलासंघ,कासारवर्णे…

Read Full News

ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात गाबीत समाज पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन…

⚡मालवण ता.२०-:राज्यात सुरु असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघाच्या वतीने दि. २३ व २४ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय लक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात गाबीत समाज सिंधुदुर्गच्या सर्व जिल्हा व तालुका शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने दिनांक २३ व २४ सप्टेंबर रोजी…

Read Full News

राज्य शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार श्री. प्रकाश विठोबा कानूरकर यांना जाहीर…!

⚡मालवण ता.२०-:मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री. प्रकाश विठोबा कानूरकर यांना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११. ३०वा. मुंबई नरिमन पॉईंट येथे होणाऱ्या पुरस्कार प्रदान समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री. कानूरकर यांना…

Read Full News

आमदार पडळकर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-एसपी आक्रमक…

कुडाळमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन.. कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुडाळमध्ये पडळकर यांचा प्रतीकात्मक पुतळा उभारून त्याला जोडे मारो आंदोलन करून आणि दहन…

Read Full News

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी किल्ले विजयदुर्गचा परिसर झाला चकाचक…

भाजपा पडेल मंडलने शिवरायांचा वारसा जपत साजरा केला भाजपा प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस.. देवगड – भाजपाच्या सेवा पंधरावडा दरम्यान प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले विजयदुर्ग च्या सर्व परिसरात पडेल मंडल भाजपातर्फे आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 200 कार्यकर्ते आणि 40 ग्रास कटर मशीन ने आज जागतिक वारसा स्थळ असलेल्या किल्ले विजयदुर्ग परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन…

Read Full News

सिंधुदुर्ग पहिल्या क्रमांकावर येतो, याचा सार्थ अभिमान…

आमदार दीपक केसरकर:सावंतवाडी येथील गुरुसेवा सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२०-: जिल्ह्यातील शिक्षक हे गुणवत्तापूर्वक मार्गदर्शन करतात. त्यामुळेच महाराष्ट्रात सिंधुदुर्ग पहिल्या क्रमांकावर येतो, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. याच खरं श्रेय शिक्षकांना आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी काढले. सावंतवाडी येथील गुरुसेवा सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत…

Read Full News

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सुधीर दळवीच्या माध्यमातून वह्या वाटप…

⚡सावंतवाडी ता.२०-: रवींद्रजी चव्हाण प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा चिटणीस श्री. सुधीर दळवी माध्यमातून व सहकार्यातून वह्या देण्यात आल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगे नं. 1 या शाळेमध्ये घोटगे सरपंच सौ. भक्ती भरत दळवी व पोलीस पाटील सौ. स्नेहा सुधीर दळवी यांच्या हस्ते मुलांना वह्या वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी घोटगे गावचे…

Read Full News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत २८ रोजी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा…

भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा यांच्यावतीने आयोजन.. सावंतवाडी । प्रतिनिधी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधूनभारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा यांच्यावतीनेजिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कॉलेज येथे रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा होणार आहे.स्पर्धेचा विषय…

Read Full News

कणकवलीत भरधाव कारचा दुचाकीला धडक…

कणकवली : गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारने पटवर्धन चौकात दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याला शुक्रवारी रात्री १०:४५ वाजता जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारचालकाने कार (आरजे ०६ सीडी ८०१०) पुन्हा वळवून मुंबईच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी पुजारी इलेक्ट्रॉनिक्ससमोर त्याला पकडून चोप दिल

Read Full News

स्पर्धात्मक आव्हानांना सामोरे जा…

ऐश्वर्या काळूशे:मस्जिद मोहल्ला शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात.. कुडाळ : स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी येणारी अनेक आव्हाने स्वीकारली पाहिजेत, तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, असे प्रतिपादन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी कुडाळ मस्जिद मोहल्ला येथे सांस्कृतिक मेळाव्यात केले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने कुडाळ शहरातील फातिमाबी मेमोरियल ट्रस्ट आणि फातिमाबी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू सेमी…

Read Full News

You cannot copy content of this page