⚡सावंतवाडी ता.२४-: जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मंजिरी मनोहर कांबळे, मनोहर शरद कांबळे, प्रशांत सुभाष साटेलकर, मोतीराम विलास साटेलकर,* सर्व रा.साटेली यांच्याविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. देशमुख मॅडम यांनी सबळ पुरावा अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपी यांचे अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अॅड. गणेश प्रकाश चव्हाण, अॅड. दत्तप्रसाद विश्वास ठाकूर, अॅड. केतन जाधव यांनी काम पाहिले.
सदर घटना अशी की, फिर्यादी साटेली ग्रामपंचायती सदस्य म्हणून काम करीत. माहे जानेवारी २०२० मध्ये फिर्यादी मुंबईला कामाधंद्यानिमित्त गेले असून, 05/06/2020 रोजी सकाळी ११.०० वाजता साटेली गावात आली. गावात येण्या पूर्वी तिने मळेवाड प्राथमिक केंद्र येते जाऊन तिची कोरोनाबाबत तपासणी करून घेतली होती. ती गावात येताच तिला गावातील कोविड -19 कमिटीने जिल्हा परिषद शाळा नंबर 1 साटेली मधलीवाडी आलगीकरण कक्षात राहण्यास सांगितले फॅरियडी ह्यांची मुलगी ही त्या ठिकाणी एकटी राहण्यास घाबरत असल्याने फॅरियडी हिचे पती 11 वाजण्याच्या सुमारा सोबतीला गेले आणि संध्याकाळी फिर्यादी आपल्या मुलीगी साठी आणि पती साठी संध्याकाळी 7:30 आपल्या मुलग्याला सोबत जिल्हाधिकारी परिषद शाळा साटेली येते गेले तेव्हा साटेली ग्रपंचायत सदस्य मंजिरी कांबळी ही त्या ठिकाणी आली फिर्यादी हिने तिला विचारले तू ह्या ठिकाणी कशासाठी आली तुझ्या तोंडाला मास्क सुद्धा नाही तेव्हा तिचा न्हवरा आला व फिर्यादी हिच्या मुलग्याच्या मानगुतीस पकडून दाबूम धरले व तुला चिरडून, मुरडून मारून टाकेन व जाधववाडीत येऊन घरला आग लावीन अशी धमकी दिली त्यावेळी प्रशांत सुभाष साटेलकर रा साटेली हा तिथे आला व त्याने फिर्यादी ह्यांला उद्देशून म्हारणीच्या पोरक शाळेत कशाला तिला बाहेर काढा नाही तर शाळेला आग लावीन अशी धमकी दिली तसाच तिथे आलेला मोतीराम विलास साटेलकर त्याने म्हारणीच्या पोरक बाहेर काढा आमच्या शाळेत नको आमची शाळा आहे. फिर्यादी आणि फिर्यादीच्या मुलीलाबाबत उच्चार काढले आसा आरोप मंजिरी दशरथ कांबळी प्रशांत सुभाष साटेलकर मोतीराम विलास साटेलकर ह्याच्यावर होता. या तक्रारी वरून आरोपींवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ कलम ३(१)(R)(S) व भारतीय दंड संहिता कलम ३२३, ५०४ यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर केसमध्ये मे. कोर्टात साक्षीदार तपासले गेले. पुरेपूर पुरावा नसल्याने व साक्षीदार यांच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने मे. कोर्टाने आरोपी यांची सबळ पुरावा अभावी तसेच आरोपी यांचे वकील यांच्या युक्तिवाद प्राप्त करून आरोपी यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे वकील अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर , अॅड. गणेश प्रकाश चव्हाण, व ऑड . दत्तप्रसाद विश्वास ठाकूर, ऑड. केतन जाधव यांनी काम पाहिले
