Headlines

सावंतवाडी येथे आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली कॅरम स्पर्धेला भेट…

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचा औचित्य:विशाल परब यांच्या संकल्पना.. ⚡सावंतवाडी ता.२१-: डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २०२५– २६ ची पहिली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा शुभारंभ काल सावंतवाडी जिमखाना येथे करण्यात आला. या स्पर्धेला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री. विशाल परब यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन भाजपा…

Read Full News

कवठी येथे भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

कुडाळ : तालुक्यातकवठी येथील भजन कला प्रेमी मंच यांच्या वतीने श्री सातेरी मंदिर कवठी येथे नवरात्रोत्सवा निमित्त तिसरी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा दिनांक २६ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषक ७००१/- व चषक,द्वितीय ५००१/- व चषक, तृतीय ३००१/- व चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.तसेच उत्तेजनार्थ…

Read Full News

सुरेश ठाकूर संपादीत ‘बीज अंकुरे’ला कोमसाप केंद्रीय पुरस्कार जाहीर…

मालगुंड येथे ८ नोव्हेंबरला पुरस्कार वितरण.. कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषदेचे मालवण शाखा अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी संपादीत केलेल्या व कोमसाप मालवणच्या १८ ललित लेखकांनी साकारलेल्या ‘बिज अंकुरे अंकुरे’ या पुस्तकाला कोमसापचा संपादनाचा पहिला पुरस्कार नुकताच जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण ८ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरी येथील कवितेची राजधानी मालगुंड येथे सन्मानपूर्वक होणार…

Read Full News

साहित्यिक वैशाली पंडित यांच्या ‘मंत्रभूल’ पुस्तकाला कोमसापचा पुरस्कार जाहीर…!

⚡मालवण ता.२१-: कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाड्मयीन पुरस्कार जाहीर झाले असून यात सिंधुदुर्ग मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांच्या ‘मंत्रभूल’ या पुस्तकाला ‘कै.अनंत काणेकर ललितगद्य प्रथम पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय अध्यक्ष सौ. नमिता किर यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे संपन्न झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मंत्रभूल…

Read Full News

बस प्रवासात इसमाचा मृत्यू…

⚡कणकवली ता.२१-:खासगी बस मधून प्रवास करत असताना अत्यवस्थ वाटू लागल्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मेलरॉय जॉन डिसोझा (५८, पणजी – गोवा) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ९.३० वा. सुमारास घडली.मेलरॉय हे पणजी ते मुंबई प्रवास करत होते. बस कणकवलीनजीक आली असता मेलरॉय यांना अचानक अत्यवस्थ वाटू लागले. त्यानंतर ते बेशुद्धही…

Read Full News

मालवण शहरात भारतीय मजदूर संघातर्फे घरेलू कामगार महिलांची भव्य रॅली…!

⚡मालवण ता.२०-: असंघटित घरेलू कामगारांसाठी शासनाने शाश्वत योजना राबवून त्यांना आर्थिक बळकटी व सामाजिक सुरक्षितता द्यावी, या मागण्यांसाठी आज मालवण शहरात भारतीय मजदूर संघातर्फे घरेलू कामगार महिलांची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. भारतीय मजदूर संघातर्फे आज दुपारी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात महिलांचा मेळावा घेऊन त्यानंतर शहरातून रॅली काढण्यात…

Read Full News

स. का. सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे पर्यटन साप्ताहाचे आयोजन…

विविध उपक्रम व स्पर्धांचा समावेश.. ⚡मालवण ता.२०-:जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, युवा टुरिझम क्लब आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात २७ सप्टेंबर रोजी टुरिझम…

Read Full News

बबन तळवडेकर यांना रस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट ओळख पटवून मालकाला केले परत…!

⚡मालवण, ता.२०-:मालवण येथील बाजारपेठेतील व्यापारी बबन तळवडेकर यांना रस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट त्यांनी ओळख पटवून मालकाला परत केले आहे. या घटनेमुळे मालवण व्यापारी संघाच्या सदस्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मालवण बाजारपेठ येथील व्यापारी बबन तळवडेकर यांना रस्त्यात एक पैशाचे पाकीट सापडले. त्यांनी ते उघडून पाहिले असता त्यात रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक…

Read Full News

प्लास्टिक वापर शून्य करूया : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आचरा समुद्र किनारी स्वच्छता अभियान : जिल्हाधिकारी यांचाही स्वच्छता मोहिमेत सहभाग.. ⚡मालवण ता.२०-:प्लास्टिक वापर दैनंदिन जीवनात कमी झाला पाहिजे. प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या, बॉटल सर्वत्र दिसून येतात. मात्र त्यांचे विघटन होत नसल्याने पर्यावरणावर या प्लास्टिकचा ताण वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी प्रत्येकाने प्लास्टिक वापर टाळल्यास ती कृती मोलाची ठरेल. यासाठी प्रत्येकाने आपल्या…

Read Full News

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत भव्य जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा…

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२०-: डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २०२५– २६ ची पहिली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा शुभारंभ आज शनिवार दिनांक २० सप्टेंबर रोजी सावंतवाडी जिमखाना येथे करण्यात आला. या स्पर्धेला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री. विशाल परब यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या…

Read Full News

You cannot copy content of this page