Headlines

सावंतवाडीच्या सांस्कृतिक जडणघडणीत तरुणाई पेलत असलेली जबाबदारी सर्वांनाच प्रेरणादायी…

भाजपा युवा नेते विशाल परब यांचे प्रतिपादन:मळेवाडच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.०६-: जकात नाका येथे श्री गणेश मित्रमंडळातर्फे आज एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा युवा नेते श्री विशाल परब यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाला विशाल परब यांनी आपली उपस्थिती…

Read Full News

पिंगुळी येथे एसटी बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू…

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर येथे पांडुरंग नारायण घाटवळ (70 रा.निवती) हे बस पकडण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना अचानक आडवे आल्याने कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसची त्यांना धडक बसली. बसच्या चाकाखाली सापडून त्याच्या पायांना तसेच डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात…

Read Full News

श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरचा “मरणोत्तर कार्यगौरव पुरस्कार” कै. संदिपभाई पारकर कुटुंबियांना प्रदान….

⚡मालवण ता.०५-:चिंदर येथील श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज भगवती मंगल कार्यालय चिंदर भटवाडी येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थेसाठी भरीव योगदान देणारे, सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे कै. संदिपभाई पारकर यांना श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरच्यावतीने देण्यात येणारा ‘मरणोत्तर कार्यगौरव पुरस्कार’ त्यांचा सुपूत्र निशांत पारकर यांना वाचनालय अध्यक्ष…

Read Full News

चौके येथील जीर्ण प्रवासी निवारा शेड निर्लेखित करावी…

सरपंच पी. के. चौकेकर यांची मागणी ⚡मालवण ता.०५-:मालवण तालुक्यातील चौके येथील जीर्ण व धोकादायक बनलेली प्रवासी निवारा शेड निर्लेखित करावी आणि नवीन प्रवासी निवारा शेड उभारावी, अशी मागणी चौके गावचे सरपंच पी. के. चौकेकर यांनी एसटी महामंडळ कणकवली विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या वर्षभरापूर्वी कणकवली विभागीय नियंत्रक यांना पत्राद्वारे ही बाब चौके ग्रामपंचायतीने…

Read Full News

गोठणे यशवंतवाडी येथील स्मशानभूमी शेड कामाचे भूमिपूजन…

⚡मालवण ता.०५-:मालवण तालुक्यातील गोठणे यशवंत वाडी येथील स्मशानभूमी शेड उभारणी बाबत ग्रामस्थांची मागणी मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू परुळेकर, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास जात असून जनसुविधा योजनेतून हे काम मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन राजू परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोठणे गावचे गाव प्रमुख दादा हाटले, माजी…

Read Full News

रामेश्वर संस्थानच्या गणपतीला भक्तीपूर्ण वातावरणात निरोप…

विसर्जन मिरवणूकीला भाविकांचा लोटला जनसागर.. ⚡मालवण ता.०५-:इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरेच्या विघ्नहर्त्याला शनिवारी ३९ दिवसांनी भावपूर्ण वातावरणात सायंकाळी उशिरा आचरा समुद्र किनारी विसर्जन करत निरोप देण्यात आला आणि गेले ३९ दिवस विविधांगी कार्यक्रमानी नटलेल्या या गणेशोत्सवाची सांगता झाली. एकोणचाळीस दिवस चाललेल्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले…

Read Full News

देऊळवाडा येथील ईस्वटी महापुरुष मंदिरात उद्या कोजागिरी पौर्णिमा उत्सव…!

⚡मालवण ता.०५-:मालवण देऊळवाडा येथील श्री ईस्वटी महापुरुष मंदिराचा कोजागिरी पौर्णिमा उत्सव दि. ६ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त श्री ईस्वटी महापुरुष मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ईस्वटी महापुरुष मंदिरात सकाळी ८ ते दुपारी १ वा. श्री ईस्वटी महापुरुष कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायं. ५ ते…

Read Full News

वेळागर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यवसायिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे…

मालवणात पोलिसांचे निर्देश.. ⚡मालवण ता.०५-:वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर येथील समुद्रात पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ‘शक्ती’ वादळाच्या धोक्यामुळे बंदर विभागाने दोन नंबरचा धोक्याचा बावटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर मालवण किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकांनी वेळागर सारखी दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे कडक निर्देश जिल्हा पोलिस प्रशासनाने पर्यटन व्यवसायिकांच्या बैठकीत दिले. वेळागर येथील…

Read Full News

मंगेश तळवणेकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांची घेतली भेट…!

⚡सावंतवाडी ता.०५-: माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी नारायण राणे यांनी अनेक वर्षानंतर भेटलेल्या मंगेश तळवणेकर यांची आपुलकीने चौकशी केली. तसेच काही काम असल्यास अवश्य हाक मार असे आश्वासित करून शाबासकीची थाप दिली. यावेळी लक्ष्मण…

Read Full News

मळेवाड येथे स्वच्छता हि सेवा अंतर्गत घर तेथे शोषखड्डा अभियान…

गटविकास अधिकारी नाईक यांच्या हस्ते तालुक्याचा प्रारंभ… सावंतवाडी-सध्या संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू असून सेवा पंधरवडा राबवला जात आहे. यालाच अनुसरून स्वच्छता,आरोग्य,महिला सक्षमीकरण अशा विविध घटकांना आवश्यक असे उपक्रम राबवले जातात. आता स्वच्छता हि सेवा अंतर्गत घर तेथे शोषखड्डा अभियान शासनाकडून सुरू करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. सावंतवाडी तालुक्याची सुरुवात…

Read Full News

You cannot copy content of this page