भाजपा युवा नेते विशाल परब यांचे प्रतिपादन:मळेवाडच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते उद्घाटन..
⚡सावंतवाडी ता.०६-: जकात नाका येथे श्री गणेश मित्रमंडळातर्फे आज एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा युवा नेते श्री विशाल परब यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाला विशाल परब यांनी आपली उपस्थिती दाखवली. परंतु याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी या कार्यकर्त्यांनी कर्जउभारणीतून वाद्ये खरेदी करत सुरु केलेल्या श्री स्वामी समर्थ बिट्सचे देखील उद्घाटन त्यांनी याप्रसंगी केले. या त्यांच्या कृतीने युवक भारावून गेले. मेहनतीतून उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना उभारी मिळावी हीच आपली इच्छा असल्याचे सांगत यावेळी श्री विशाल परब यांनी वाद्यवादनाचा आनंदही लुटला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी विशाल परब यांच्या समवेत
हेमंत मराठे नंदू नाईक गुरु नाईक अमोल नाईक प्रीतम गावडे प्रतीक नाईक अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
