सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू..

⚡सावंतवाडी ता.२६-: आजगाव-भोमवाडी येथील रिक्षाचालक विनायक रंगनाथ बाळे (वय ४२) हे प्रवाशाला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सोडून रिक्षाने आजगाव-भोमवाडी येथे परतत असताना बोलेरो वाहनाने त्यांच्या रिक्षाला समोरून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात बाळे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच मळेवाड-कोंडूरेचे उपसरपंच हेमंत मराठे, सागर नाईक व साहिल नाईक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अटल प्रतिष्ठान सावंतवाडी, कै. सदाशिव सखाराम मराठे सेवाभावी ट्रस्ट व युवा मित्र मंडळ, मळेवाड-कोंडूरे यांच्या रुग्णवाहिकेतून जखमी बाळे यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून आवश्यक इंजेक्शन व औषधे दिली. तसेच सीटी स्कॅन करण्यात आला असून सध्या त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनीही तातडीने सहकार्य केले. जखमीच्या उपचारासाठी पत्रकार व उपसरपंच हेमंत मराठे, सागर नाईक आणि साहिल नाईक यांनी मोलाचे सहकार्य केले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. सभा लाड खान, डॉ. दिनेश संगेवार तसेच आरोग्य कर्मचारी कृष्णा जाधव यांनी जखमी बाळे यांच्या डोक्याला टाके घालण्यासह आवश्यक उपचार करण्यासाठी सहकार्य केले.
