गोठणे यशवंतवाडी येथील स्मशानभूमी शेड कामाचे भूमिपूजन…

⚡मालवण ता.०५-:
मालवण तालुक्यातील गोठणे यशवंत वाडी येथील स्मशानभूमी शेड उभारणी बाबत ग्रामस्थांची मागणी मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू परुळेकर, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास जात असून जनसुविधा योजनेतून हे काम मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन राजू परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गोठणे गावचे गाव प्रमुख दादा हाटले, माजी उपसरपंच बाळा परब, राजू लाड, घनश्याम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सोनाली पालांडे, अर्चना मुणगेकर, संतोष धुरी, दया हाटले, शुभम तावडे भाई जठार, मांजरेकर, महेश चिंदरकर, नागेश यांसह यशवंत वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page