देऊळवाडा येथील ईस्वटी महापुरुष मंदिरात उद्या कोजागिरी पौर्णिमा उत्सव…!

⚡मालवण ता.०५-:
मालवण देऊळवाडा येथील श्री ईस्वटी महापुरुष मंदिराचा कोजागिरी पौर्णिमा उत्सव दि. ६ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त श्री ईस्वटी महापुरुष मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त ईस्वटी महापुरुष मंदिरात सकाळी ८ ते दुपारी १ वा. श्री ईस्वटी महापुरुष कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायं. ५ ते ८ वा. लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, रात्रौ ८ वा. महाआरती व दुध पोहे कार्यक्रम, रात्रौ ९ वा. श्री देवी घुमडाई प्रासादिक भजन मंडळ, घुमडे चे बुवा श्री. नाना सामंत यांचे भजन होणार असून पखवाज साथ श्री. योगेश सामंत यांची लाभणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page