Headlines

कनिष्ठ गट कॅरम स्पर्धेत कणकवलीच्या दिव्या राणेचा डबल धमाका…

⚡कुडाळ ता.०६-: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या सहाव्या कनिष्ठ गट जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत कणकवलीच्या दिव्या राणे हिने १२ व १८ वर्षांखालील मुली या दोन्ही वयोगटात विजेतेपद पटकावले तर सावंतवाडीच्या भारत सावंतने १४ वर्षांखालील मुले विजेता व १८ वर्षाखालील मुले उपविजेता असे दुहेरी यश मिळविले. सावंतवाडीच्याच अमूल्य घाडीने अठरा वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. देवगडच्या मिहीर…

Read Full News

ओंकार’ हत्तीला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी वन विभागाने मोहिमघेतली हाती…

उप वनसंरक्षक मिलीश शर्मा:वन विभागाचे पथक या हत्तीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.. ⚡सावंतवाडी ता.०६-: गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून फिरणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी वन विभागाने मोहिम हाती घेतली आहे. सध्या हा हत्ती कास आणि सातोसे गावांमध्ये असून यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाचा रेस्क्यू ऑपरेशनचा प्रयत्न सुरु…

Read Full News

फोंडा तिठा ते घाटपायथा रस्ता जीवघेणा खड्ड्यांनी भरला; उपोषणाचा इशारा…

⚡कणकवली ता.०६-:देवगड – निपाणी राष्ट्रीय महामार्गावरील फोंडा तिठा ते घाटपायथा तर हुंबरठ तिठा ते करुळ मार्गे फोंडा तिठा हा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः जीवघेणा बनला आहे. आजवर या मार्गांवर अनेकांनी आपले जीव गमावले. ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे, सततचे पावसाचे पाणी आणि डांबर उखडलेले पृष्ठभाग यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दररोज…

Read Full News

रेल्वे प्रवासात बेपत्ता झालेल्या इसमाचा मृतदेह सापडला…

⚡कणकवली ता.०६-: रेल्वे प्रवासात बेपत्ता झालेले सुधाकर उर्फ सुधीर बुधाजी गवस (४६, रा. सासोली, ता. दोडामार्ग) हे सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे मार्गावरील नागवे ब्रिजखाली नाल्यामध्ये मृत्तावस्थेत आढळून आले. सुधीर रेल्वेतून नेमके कसे खाली पडले, हे समजू शकलेले नाही. सुधीर हे अंध असून ते अन्य काहींसमवेत मुंबईला जाण्यासाठी तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. शनिवारी रात्री ८.३०…

Read Full News

फार्मर आयडी नोदणी कृषि मेळाव्याला झाराप मधे उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ : शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी झाराप ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रामध्ये करता यावा म्हणून डीजीटल क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी मित्रानो, ह्याचे अनेक फायदे आहेत. योजनेचा लाभ पिक विमा, अनुदान ह्या सारख्याबाबी मध्ये शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये व लाभार्थी शेतकऱ्याला त्याचा लाभ फसवणूक न होता त्याच्या पर्यंत पोहचवणे…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा लिजेंड क्रिकेटर्स जपणार खेळासोबत सामाजिक बांधिलकी…

ओरोस येथे कार्यकारिणीची सभा संपन्न.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा लिजेंड क्रिकेटर्स कार्यकारिणीची सभा पी.एफ. डॉन्टस सभागृह ओरोस येथे दिपक भोजने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ह्या सभेत क्रिकेट बाबतीत काय करता येईल, सामाजिक बांधिलकी कशाप्रकारे पार पाडता येईल तसेच आपल्या लिजेंड सदस्यांना कसा आनंद देता येईल याबाबतच विचार विनिमय झाला.अध्यक्ष दिपक भोजनें यानी तर आपल्या भाषणात…

Read Full News

फळपीक विमा प्रश्नी म.वि.आ. तर्फे ९ ऑक्टोबरला ओरोस येथे धरणे आंदोलन…

‘ढोल बजाओ कृषिमंत्री भागाओ’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन:वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना विमा रक्कम नाही.. ⚡कुडाळ ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे विमा कंपनींच्या मुजोरीला कंटाळून महाविकास आघाडीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ज्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाहीत, अशा कृषीमंत्र्यांना हटवलेच पाहिजे! असा हल्लाबोल करत येत्या गुरुवारी ९…

Read Full News

कॅथॉलिक पतसंस्थेचा 32 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…!

⚡सावंतवाडी ता.०६-: कॅथॉलिक पतसंस्थेचा 32 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या प्रधान कार्यालयात रेव्ह.फा मिलेट डिसोजा यांच्याकडून प्रार्थना करण्यात आली व संस्थेच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ग्राहक, सभासदांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.केवळ 32 वर्षांच्या कालावधीत व फक्त 07 शाखांच्या माध्यमातून संस्थेने आज ₹ 450 कोटी एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.संस्थेला सतत…

Read Full News

सावंतवाडी येथे ९ रोजी “पाणी वापर संवर्धनावर आधारित नृत्यनाटिका”,कार्यक्रमाचे आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.०६-: कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे अंतर्गत दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांचे विद्यमाने “पाणी वापर संवर्धनावर आधारित नृत्यनाटिका” हा शेतकऱ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम सावंतवाडी येथे ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, मांगिरीश सांस्कृतिक हाॅल, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना पाण्याचा शास्त्रशुद्ध वापर, पाण्याचे संवर्धन आणि शाश्वत…

Read Full News

कारिवडे तंटामुक्ती अध्यक्षपदी शंकर मिस्त्री यांची निवड…!

⚡सावंतवाडी ता.०६-: कारिवडे तंटामुक्ती अध्यक्षपदी शंकर मिस्त्री यांची निवड करण्यात आली आहे यावेळी भाजप आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपस्थितांकडून देखील त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Read Full News

You cannot copy content of this page