फोंडा तिठा ते घाटपायथा रस्ता जीवघेणा खड्ड्यांनी भरला; उपोषणाचा इशारा…

⚡कणकवली ता.०६-:
देवगड – निपाणी राष्ट्रीय महामार्गावरील फोंडा तिठा ते घाटपायथा तर हुंबरठ तिठा ते करुळ मार्गे फोंडा तिठा हा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः जीवघेणा बनला आहे. आजवर या मार्गांवर अनेकांनी आपले जीव गमावले. ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे, सततचे पावसाचे पाणी आणि डांबर उखडलेले पृष्ठभाग यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दररोज या मार्गावरून शालेय बस, प्रवासी वाहने, रुग्णवाहिका, खाजगी व शासकीय एसटी बसेस आणि मालवाहतूक गाड्यांचा वावर असतो. मात्र रस्त्याच्या अत्यंत वाईट स्थितीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांचा संताप उसळला आहे.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ विशाल रेवडेकर, यांच्यासह फोंडाघाट मधील समाजसेवक भाई हळदीवे, संदेश पटेल, पांढरीनाथ उर्फ भाई गुरव, दिलीप साटम,महेश रेवडेकर, विजय शिंदे, समीर मर्ये सिद्धेश राणे, प्रतिभा अवसरे, माधवी दळवी, संजना कोलते,यांनी धडक देत दोन्ही रस्त्यावरील खड्डे आगामी 15 दिवसाच्या आत न भरल्यास शासकीय विश्राम गृहच्या कोट्यावधी रुपयांची उधळण करून vvip लोकांसाठी बांधन्यात आलेल्या इमारतीच्या बाहेर आमरण उपोषणचा ईशारा दिला.त्यानंतरत बांधकाम च्या अधिकाऱ्यांनी पुढील कही दिवसात हुंबरठ ते फोंडा तिठा आणि HAM च्या अधिकाऱ्यांनी फोंडा तिठा ते घाटपायाथापर्यंत चा रस्ता निरधोक करून देण्याचे आश्वासन यावेळी फोंडाघाट मधील नागरिकांना दिले.

   रस्त्याची दुरवस्था कायम असून, फोंडा घाट हा परिसर अपघातप्रवण झोन बनला आहे. नागरिकांनी यापूर्वीही अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधले, असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलें. स्थानिक जनतेच्या सुरक्षेसाठी रस्ता तातडीने खड्डेमुक्त करण्यात यावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. अन्यथा काम पुर्ण न झाल्यास उपोषणाचा पर्याय करावा लागेल असा इशारा विशाल रेवडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला.
You cannot copy content of this page