Headlines

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सवात देवगडच्या ‘श्वास’ नाटिकेला प्रथम क्रमांक

वेंगुर्ला
जिल्हा विज्ञान मंडळ, सिंधुदुर्ग व जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम शनिवार दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह वेंगुर्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विज्ञान, समाज आणि दैनंदिन जीवनातील विविध प्रश्नांवर प्रभावी भाष्य करणाऱ्या नाटिकांच्या सादरीकरणामुळे हा नाट्योत्सव विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि कलागुणांचा सुंदर आविष्कार ठरला.
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळांच्या संघांनी या जिल्हास्तरीय नाट्योत्सवात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव, पर्यावरण, आधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी जीवनाशी निगडित विविध विषय अत्यंत प्रभावीपणे नाट्यरूपातून मांडले.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक :
शेठ म. ग. हायस्कूल, देवगड – ‘श्वास’
या संघाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
उत्कृष्ट स्त्री अभिनय :
कु. अनन्या जोशी -शेठ म. ग. हायस्कूल, देवगड.
द्वितीय क्रमांक :
एस. एम. हायस्कूल, कणकवली – ‘स्मार्ट व्हर्जन’.
उत्कृष्ट पुरुष अभिनय :
कु. सोहम ताटे – एस. एम. हायस्कूल, कणकवली.
उत्कृष्ट दिग्दर्शन :
प्रथम क्रमांक – एस. एम. हायस्कूल, कणकवली.
तृतीय क्रमांक :
कुडाळ हायस्कूल, कुडाळ-‘मिशन तारांगण’.
याशिवाय ‘उत्कृष्ट लेखनाचा प्रथम क्रमांक’ देण्यात आला. सहभागी सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
या विज्ञान नाट्योत्सवाला माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आ. दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष पप्पू परब,शिवसेना जिल्हा समन्वयक
सचिन वालावलकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच शिक्षणाधिकारी श्री. किंजवडेकर, गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे , विस्तार अधिकारी आवटी, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, सचिव सत्यपाल लाडगांवकर, सहसचिव संजय शेवाळे, कोषाध्यक्ष राजाराम फर्जंद, संघटक सतीशकुमार कर्ले यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष, आनंदा बामणीकर, ऋषिकेश गावडे, मिलिंद गावकर, चंद्रकांत चव्हाण, तानाजी चव्हाण, स्वप्नील पाटील, प्रिती सावंत, तृप्ती देसाई, सविता जाधव, समुद्रे, प्रणिता बांबूळकर तसेच रा. कृ. पाटकर हायस्कूल वेंगुर्लाचे मुख्याध्यापक सुशांत धुरी यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या
विज्ञान नाट्योत्सवाला विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी ७९३ हून अधिक जणांची उपस्थिती होती. त्यामुळे जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवाला मिळालेला हा प्रतिसाद जिल्ह्यातील विज्ञानविषयक उपक्रमांविषयीची वाढती आस्था अधोरेखित करणारा ठरला.
नाट्योत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला सभापती शंकर घारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सभागृह तसेच आवश्यक त्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या.
जिल्हा विज्ञान मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघ, विविध शिक्षक संघटना, जिल्हा व तालुका पतपेढ्यांचे संचालक मंडळ, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर संघटना यांनीही मोलाचे सहकार्य केले.
वेंगुर्ला हायस्कूल व पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला येथील संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसह परिसरातील माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उल्लेखनीय सहकार्य केले.
नाटिका सादर करणाऱ्या सर्व शाळांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, सहभागी विद्यार्थी तसेच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, वेशभूषा, ध्वनी, प्रकाशयोजना व इतर तांत्रिक बाबींमध्ये योगदान देणाऱ्या सर्व टीमचे विशेष योगदान लाभले.या
नाट्योत्सवाच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, रोप व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
विज्ञान नाट्योत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे केवळ पाठ्यपुस्तकाच्या चौकटीतून न पाहता वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, अभिनयकौशल्य, सामाजिक जाणीव आणि संघभावना यांचा समन्वय साधण्याची संधी मिळाली. जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे आणि वैज्ञानिक जाणिवेचे प्रभावी दर्शन घडवून हा नाट्योत्सव संस्मरणीय केला.

You cannot copy content of this page