Headlines

प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या ३०० वर्षपूर्तीनिमित्त पुजारी प्रमोद भागवत यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०१-: प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदिरास २०२५ मध्ये ३०० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने किर्तनकार विश्वनाथ ( भाऊ) नाईक यांच्या शुभहस्ते मंदिरांचे पुजारी प्रमोद भागवत यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. गेली अनेक वर्षे त्यांच कुटुंब व ते पुजारी म्हणून इथे सेवा देत आहेत. मंदिरास ३०० वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने त्यांचा…

Read Full News

सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय…

महेश सारंग:कारिवडे गावात ८ विकासकामांचे भूमिपूजन… ⚡सावंतवाडी ता.०१-: भाजप सरचिटणीस महेश सारंग यांच्या विशेष प्रयत्नातून कारिवडे गावात 8 मंजुर विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कारिवडेच्यावतीने पार पडला. यावेळी कारिवडे गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. साकव, बंधारे आणि रस्त्यांच्या कामांमुळे ग्रामस्थांची मोठी सोय होणार असून शिवकालीन तळीच्या विकासामुळे पर्यटनालाही चालना मिळेल असा…

Read Full News

नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या पुढाकाराने सोमवार पेठ स्मशानभूमी लख्ख प्रकाशाने उजळली…

⚡मालवण ता.०१-:मालवण शहरातील सोमवार पेठ येथील स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे लक्ष देत नगरसेवक मंदार ओरसकर यांनी स्वखर्चाने या ठिकाणी विद्युत रोषणाईचे काम पूर्ण केले आहे. यामुळे बऱ्याच काळानंतर ही स्मशानभूमी आता लख्ख प्रकाशाने उजळली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. स्मशानभूमी परिसरात रात्रीच्या वेळी वावरताना अंधारामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन…

Read Full News

राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची गैरसोय थांबणार…

नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्या पुढाकाराने ‘बायो टॉयलेट’ सुविधा उपलब्ध… ⚡मालवण ता.०१-:मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र, या ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांनी तत्परतेने याठिकाणी बायो टॉयलेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे….

Read Full News

भंडारी समाजाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा ४ जानेवारी रोजी भव्य सत्कार…

⚡मालवण,ता.०१-:सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण आणि भंडारी ज्ञाती बांधवांच्या वतीने शहरातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मालवण भरड येथील लीलांजली हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यात मालवण शहराच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा ममता मोहन वराडकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर,…

Read Full News

श्रीगणेश गावकर, सुधीर पडेलकर प्रशांत हिंदळेकर यांना मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.०१-:मालवण तालुका पत्रकार समितीचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल सभागृह येथे सर्व पुरस्कारांचे वितरण होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम यांनी दिली आहे. मालवण पत्रकार समितीच्या वतीने वार्षिक पुरस्कार जाहीर…

Read Full News

आरोंदा येथील जिल्हास्तरीय समूहगीत व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

स्पर्धेला विद्यार्थांनी दिला भरभरून प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.०१-: आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आरोंदा या संस्थेच्या आरोंदा हायस्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय समूहगीत व चित्रकला स्पर्धा (सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग )संपन्न झाल्या.सदर स्पर्धा ही आरोंदा गावचे सुपुत्र डॉ .पी. वाय .नाईक (ज्येष्ठ संशोधक )यांच्या पत्नी स्वर्गीय पुष्पा प्रभाकर नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आरोंदा हायस्कूलच्या…

Read Full News

वाहन चालकांनो सावधान!. साटेली येथील रस्त्यावर पडलेला खड्डा वाढतोय…

रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी:- वाहनचालकांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०१-: मळेवाड ते सातार्डा मुख्य रस्त्यावरील साटेली येथील ग्रामपंचायत शेजारील मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा अधिकच रुंदावत आहे.गेले कित्येक दिवस हा पडलेला खड्डा तसाच असून तो अधिकच वाढत आहे.रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा आणि रस्त्यावर असलेले वळण यामुळे वाहनचालकांची एकच धांदल उडत आहे.खोलवर पडलेला आणि रुंदावत चाललेला…

Read Full News

स्वामीच्छा पदयात्रा मंडळाकडून नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा सत्कार…

⚡कणकवली ता.०१-: स्वामीच्छा पदयात्रा मंडळ, मुंबई ते अक्कलकोट यांच्या वतीने नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कारप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वैभववाडी सहसंपर्क प्रमुख श्री. प्रसाद नारकर उपस्थित होते. यावेळी श्री. संजय जगताप, श्री. सचिन हांडे तसेच श्री. संजय परांजपे यांचीही उपस्थिती होती. स्वामीच्छा पदयात्रा मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या धार्मिक व सामाजिक…

Read Full News

प्रत्येक कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करा, जनतेच्या कामात बेदबाबदारपणा दिसता नये…

कणकवली नगरपंचायत चा कारभार गतिमान होण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागा:नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना.. ⚡कणकवली ता.०१-: कणकवली नगरपंचायतीचा कारभार गतिमान व्हायला हवा. सांडपाणी निचरा व्यवस्था केल्याशिवाय कुठल्याही संकुलांना पूर्णत्वाचा दाखला देऊ नका, शहरातील सर्व स्वच्छतागृहांची दररोज सफाई व्हायला हवी. नळपाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवा. प्रत्येक कर्मचाऱ्यावर कामाची जबाबदारी निश्चित करा. कुणाकडूनही बेजबाबदारपणा होता नये….

Read Full News

You cannot copy content of this page