Headlines

सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत…

पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण:प्रेस क्लब च्या माध्यमातून पत्रकार दिन साजरा.. ⚡सावंतवाडी ता.०७-: आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब च्या वतीने सावंतवाडीत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पोलिस निरीक्षक…

Read Full News

सावंतवाडी गणपती मंदिर परिसरात सांडपाण्याचा नागरिकांना होतोय त्रास…

अमित गवंडळकर यांनी नागरिकांच्या उपस्थितीत वेधलं नगराध्यक्षांचे लक्ष: त्वरित उपयोजना करू, नगराध्यक्षांचं आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.०७-:सावंतवाडी शहरातील गणपती मंदिराजवळील परिसरात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नसल्यामुळे नागरिकांना तसेच भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी अमित गवंडळकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्याकडे लेखी निवेदनद्वारे तक्रार करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे….

Read Full News

शिवाजी प्रागतिक स्कुलचीवेंगुर्ला पोलीस स्थानकास भेट…

⚡वेंगुर्ला ता.०६-: जिल्हा प्रशासनाच्या आदेशानव्ये वेंगुर्ला पोलीस स्थानकाच्या वतीने रेझिंग डे सप्ताह राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज मंगळवारी शहरातील पी एम श्री शिवाजी प्रागतीक स्कुल कॅम्प वेंगुर्ला च्या विद्यार्थ्यांनीवेंगुर्ला पोलीस स्थानकास भेट देऊन कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी वेंगुर्ला पोलिसांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी महिला पोलीस हवालदार दिपा मठकर, एस. एस. मुळीक यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांचे…

Read Full News

कणकवलीत पर्यावरणविषयक कायदेशीर साक्षरता कार्यक्रम…

⚡कणकवली ता.०६-: तालुका विधी सेवा समिती, कणकवली व वकील संघटना, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय, कणकवली येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी “Protect Today, Secure Tomorrow – Environmental Legal Literacy & Community Protection Initiative” या संकल्पनेअंतर्गत पर्यावरणविषयक कायदेशीर साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, पर्यावरण विषयक कायदे, नागरिकांची कर्तव्ये आणि…

Read Full News

मालवण नगरपालिकेत उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांचा गट स्थापन…

गटप्रमुखपदी महेंद्र म्हाडगुत यांची निवड.. ⚡मालवण ता.०६-:मालवण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडून आलेल्या चार नगरसेवकांनी एकत्र येत ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण नगरपरिषद गट’ स्थापन केला आहे. या गटाच्या गटप्रमुखपदी महेंद्र सुदाम म्हाडगुत यांची एकमताने निवड केली आहे. याबाबतचे पत्र नगरविकास विभागाला सादर करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक महेंद्र म्हाडगूत,…

Read Full News

कणकवली येथे १० रोजी जिल्हा सॉफ्टबॉल संघ निवड चाचणी…

⚡मालवण ता.०६-:महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व सोलापूर जिल्हा साॅप्टबाॅल असोसिएशन तर्फे दि. १८ ते २१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ३१ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ (मुले व मुली) निवड चाचणीचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा हौशी सॉफ्टबॉल असोसिएशन, मालवण यांच्या वतीने शनिवार दि. १० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता विद्यामंदिर कणकवली प्रशालेच्या मैदानावर…

Read Full News

उमेश नेरुरकर यांना आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार जाहीर…

जिल्हा व्यापारी महासंघाकडून पुरस्काराची घोषणा.. ⚡मालवण ता.०६-:सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्याच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या पुरस्कारातील महत्वाच्या आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्काराची घोषणा महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी केली असू यात सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ‘आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार’ मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना जाहीर झाला आहे. व्यापारी महासंघाच्यावतीने दरवर्षी कै. प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी…

Read Full News

टोपीवाला हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा १७ रोजी स्नेहमेळावा…

⚡मालवण ता.०६-:मालवण येथील टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे टोपीवाला हायस्कूल आणि मालवण एज्युकेशन सोसायटीशी संलग्न इतर शैक्षणिक संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत मालवण टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या स्नेहमेळाव्यात संघटनेचा वार्षिक अहवाल, कार्यपद्धती याची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर एमव्हीएसच्या वेबसाईटचे उद्घाटन केले…

Read Full News

साहित्यिका वैशाली पंडित यांच्या ‘आगीनझाड’ कथासंग्रहाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन…

⚡मालवण ता.०६-:मालवण मधील ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित लिखित ‘आगीनझाड’ या गाजलेल्या कथासंग्रहाच्या रौप्यपर्व पूर्ती सोहळा वर्षानिमित्त ‘आगीनझाड पंचविशी’ या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्या सहकार्याने तसेच ऐलमा पैलमा अक्षर देवा, सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाच्या वतीने रविवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता बॅ….

Read Full News

वराडकर हायस्कुलमध्ये गावठी आठवडा बाजाराचे आयोजन…

⚡मालवण ता.०६-:कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे दि. ८ जानेवारी रोजी प्रशालेच्या मैदानात सकाळी ८. ३० वा. गावठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात पिकवली जाणारी विविध धान्य तसेच तयार होणारी विविध उत्पादने यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान, विक्री कौशल्य विकसित व्हावे व त्यांना स्थानिक बाजारपेठ मिळावी या…

Read Full News

You cannot copy content of this page