⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी, रेल्वे स्टेशन, निगुडे, सोनुर्ली बांदा, अशा बस सेवा सुरू करा अशी मागणी निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे व लोकप्रतिनिधी केले होते या मागणीला यश आज पासून 11 बस सेवा सुरू करण्यात आले आणि निगुडे तिठा या ठिकाणी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य श्री नितीन राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून बस याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नितीन राऊळ म्हणाले की आम्ही आपल्या गावात विजय झाल्यानंतर आलो त्यावेळी आपली महाशिवरात्रीला आमच्याकडे मागणी होती की बस सेवा सुरू करा त्यामुळे आपल्या सेवेत आजपासून मत सेवा सुरू झालेली आहे याचा आपण त्याचा आपण लाभ घ्या असे आवाहन त्यांनी केले मी सर्वांनी एसटीने प्रवास केला असे सांगितलं आणि स्वतः ते निगुडे ते बांदा असा प्रवास त्यांनी केला त्यांच्यासोबत इन्सुली पंचायत समिती सदस्य सदानंद राणे कास सरपंच प्रवीण पंडित व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी एसटीत्न प्रवास केला यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या या प्रवासाचे कौतुक केले. खालील प्रमाणे सावंतवाडी बस स्थानक रेल्वे स्टेशन ते सोनुर्ली,निगुडे,मार्गे बांदा बस स्थानक वेळापत्रक
१) बांदा सकाळी ०७:१५ वा. ते निगुडे,सोनुर्ली मार्गे रेल्वे स्थानक सकाळी ०८:०० वा.
२) सावंतवाडी सकाळी ०९:०० वा.रेल्वे स्थानक मार्गे सोनुर्ली ,निगुडे, बांदा सकाळी ०९:४५ वा.
३) बांदा बस स्थानक सकाळी ०९:५० वा. ते निगुडे, सोनुर्ली रेल्वे स्टेशन सकाळी १०:३५ वा.
४) सावंतवाडी रेल्वे स्टेशन सकाळी ११:३० वा. ते सोनुर्ली,निगुडे मार्गे बांदा बस स्थानक दुपारी १२:१५
५) बांदा बस स्थानक सकाळी ११:३० वा.निगुडे,सोनुर्ली मार्गे सावंतवाडी रेल्वे स्टेशन दुपारी १२:१५ वा.
६) सावंतवाडी रेल्वे स्टेशन दुपारी १२:१५ ते सोनुर्ली, निगुडे मार्गे बांदा बस स्थानक दुपारी ०१:३०
७) बांदा बस स्थानक दुपारी ०१:२० वा.निगुडे, सोनुर्ली मार्गे सावंतवाडी रेल्वे स्टेशन दुपारी ०१:४५
८) सावंतवाडी रेल्वे स्टेशन दुपारी ०२:०० ते सोनुर्ली,निगुडे मार्गे बांदा बस स्थानक दुपारी ०२:४५
९) बांदा बस स्थानक दुपारी ०२:५५ वा.निगुडे,सोनुर्ली मार्गे रेल्वे स्टेशन दुपारी ०३:४० वा.
१०) सावंतवाडी रेल्वे स्टेशन सायंकाळी ०५:०० वा. सोनुर्ली , निगुडे मार्गे बांदा बस स्थानक ०५:४५ वा.
११) बांदा बस स्थानक सायंकाळी ०५:५५ वा.निगुडे ,सोनुर्ली मार्गे सावंतवाडी रेल्वे स्टेशन ०६:४० अशा एकूण ११ फेऱ्या सुरू झाल्या आहेत वरील वेळापत्रक नुसार आपल्या बस सेवा सावंतवाडी रेल्वे स्टेशन ते सोनुर्ली, निगुडे मार्गे बांदा बस स्थानक अशा दररोज बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी या एसटी बस सेवेतून प्रवास करावा असे आवाहन निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केले आहे. यावेळी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, इन्सुली पंचायत समिती सदस्य सदानंद राणे, कास सरपंच प्रवीण पंडित, सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर, निगुडे माजी सरपंच शांताराम गावडे, समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, आप्पा गावडे, शिवा सावळ, माजी ग्रामपंचायत सदस्य विठू गवंडे, माजी सैनिक नाना खडककर, श्री गंगाराम गावडे, ममता गावडे, किशोर जाधव, मित्रवृंदा गावडे ,गुरु गावडे, महादेव सावंत,दक्षता गावडे, केशव देसाई, लवू नाईक, विशाल गावडे, मनोहर नाईक, राजेश मयेकर, सागर निगुडकर, महेंद्र गावडे, कीर्ती महाले, बापू गावडे, सुभाष निगुडकर, तुळशीदास केणी, भाई खडपकर , संदीप राणे,भालचंद्र नाईक, निवृत्त पोलीस अधिकारी गणेश गावडे, निलेश नाईक, बाबू गावडे, जयेश नाईक, आधी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
