मठ येथील अंडरग्राउंड विजवाहिन्याचे काम वेळीच पूर्ण न केल्यास कार्यालयावर धडक-: उमेश नाईक…

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्गांनजिक “अंडरग्राउंड विजवाहिन्या” चे काम सुरु आहे. परंतु सध्या ते काम बंदावस्थेत असून वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. गेल्या आठवडाभर, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात, गेल्या 2 दिवसात बरेच दुचाकीस्वार घसरून दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे या गंभीर बाबिकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष न पूरविल्यास ग्रामस्थांना घेऊन जाब विचारण्यात येईल, असा इशारा मठ गावठणवाडी येथील
शिवसेना पदाधिकारी उमेश नाईक यांनी दिला आहे. याठिकाणी सर्व स्पॉटवर बॅरिकेट्स योग्य दिशेत लावणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे माती भराव करणे आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात याचा फटका बसून लहान – मोठी वाहने अपघातग्रस्त होऊ शकतात. त्यामुळे संबंधित कार्यक्षेत्रात अपघात घडून आल्यास संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे , असा इशारा उमेश नाईक यांनी दिला आहे. रात्रीच्या वेळी धुमस्टाईल दुचाकी मार्गस्थ होत असून याबाबत संबंधित माती धोकादायक ठरत आहे. सबठेकेदाराने दोन दिवसात काम करण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे. याकडे वेळीच लक्ष न पुरविल्यास संबंधित कार्यालयावर ग्रामस्थसह धडक देण्यात येईल, असा इशारा उमेश नाईक यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page