राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धेत आंबोलीच्या ग्रेटा कर्पे हिला सुवर्ण पदक…
आंबोली,ता.७ : छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुल गारखेडा स्टेडियम येथे राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्टस स्पर्धेतील एअर शिल्ड गर्ल्स गटात ग्रेटा महेश कर्पे, आंबोली,बाजारवाडी, सध्या रा. सांगली, हिने सुवर्णपदक पटकावले. तिची राष्ट्रीय शस्त्रांग मार्शल आर्टस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धा शस्त्रांग मार्शल आर्टस महाराष्ट्र राज्य संघटना तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या…
