Headlines

कुडाळ इनरव्हीलचा स्टेम युरेका मशिन्स प्रोजेक्ट कौतुकास्पद…

सौ. उष्कर्षा पाटील:कणकवलीच्या आयडियल स्कुल मध्ये उभारला प्रोजेक्ट.. ⚡कुडाळ ता.०८-: इनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 चा सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणून इनरव्हील क्लब ऑफ कुडाळने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला स्टेम युरेका मशिन्स प्रोजेक्ट आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे कणकवली येथे यशस्वीपणे उभारला हि बाब कौतुकास्पद असून कुडाळ इनरव्हील अध्यक्षा सौ सानिका मदने व टीमचे कौतुकही करावे तेवढे थोडेच आहे, असे गौरवोद्गार…

Read Full News

आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका सुरू…

जलयुक्त शिवार अंतर्गत कुडाळ व मालवण साठी ६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर.. ⚡कुडाळ ता.०८-: आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनस्थरावरून मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्याचा धडाका सुरू असून आतापर्यंत मतदारसंघात कोट्यावधींचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील एकूण १४ कामांसाठी ५ कोटी ७० लक्ष…

Read Full News

चाकूचे वार करणारा संशयित आरोपी १८ तासांत पोलिसांच्या ताब्यात…

⚡कणकवली ता.०८-: कणकवली शहरात चायनीज सेंटर मधील नेपाळी कामगारावर चाकूने वर्मी घाव घालून गंभीर जखमी करणाऱ्या संशयित आरोपीच्या मुसक्या अवघ्या १८ तासांत सिंधुदुर्ग लोकल क्राईम ब्रँचच्या पथकाने कणकवली रेल्वे स्थानक परिसरात ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता आवळल्या आहेत. सुनील इंदर परिवार (वय २७ मूळ नेपाळ, सध्या राहणार कणकवली) असे आरोपीचे नाव आहे. ही कामगिरी…

Read Full News

आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन…

⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा मल्लखांब संघटना कुडाळ आणि आयडियल इंग्लिश स्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवार दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. मल्लखांब महर्षी म्हणून ख्याती असलेले आणि आपल्या मल्लखांब कौशल्य कामगिरीमुळे पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे तसेच…

Read Full News

सावंतवाडीत समाज मंदिरासमोर चारचाकी-दुचाकी अपघात; एक गंभीर जखमी…

⚡सावंतवाडी ता.०७-: येथील समाज मंदिरासमोर चारचाकी व दुचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात रात्री पावणेआठच्या सुमारास घडला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, जखमी युवकाला तातडीने उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघाताचे नेमके…

Read Full News

नरडवे गावात राजकीय उलथापालथ…

शिवसेना (उबाठा) गटाला धक्का:ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश.. ⚡कणकवली ता.०७-:नरडवे गावाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची घडामोड घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. नरडवे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य दिपाली दिनकर कदम व बुद्धदास तातू कदम यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. जि.प. माजी अध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read Full News

वायरी भूतनाथ येथील किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य…

जय भूतनाथ पर्यटन संस्थेकडून उपोषणाचा इशारा.. ⚡मालवण ता.०७-:वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी उभाटावाडी येथे समुद्र किनारी असलेल्या रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायततीने कचराकुंडी ठेवली असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला कचरा रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे गावातील लोकांना तसेच पर्यटकांना त्रास सहन करावा लागत असून याबाबत ग्रामपंचायतीकडून योग्य ती उपाययोजना न झाल्यास…

Read Full News

पोलीस स्थापना दिनानिमित्त आरोंदा प्राथमिक शाळेत मुलांना शस्त्र हाताळण्याचे धडे…

⚡सावंतवाडी ता.०७-: जि.प.पूर्ण प्राथमिक आरोंदा नंबर १ येथे “पोलीस स्थापना दिना”चे औचित्य साधून “पोलीस स्थापना दिन” साजरा करण्यात आला.यावेळी पोलीस स्थापना दिनाचे महत्व व पोलीस शस्त्रांची माहिती मुलांना देण्यात आली. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,आरोंदा दूरक्षेत्र महेश अरवारी,कॉन्स्टेबल बाबूराव जाधव ,यांचे मार्गदर्शना खाली सदरील शस्त्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक, कॉन्स्टेबल आरोंदा आशिष सापळे ,संदीप झेंडेपोलीस…

Read Full News

जिल्हा रुग्णालयात कर्करोग तपासणी शिबीर; ९४ रुग्णांची तपासणी…

⚡ओरोस ता ७-: कर्करोगाच्या निदानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कॅन्सर व्हॅन दाखल झालेली आहे. या अंतर्गत बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते फीत कापून या शिबीराचे उ‌द्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्जुन नरोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई…

Read Full News

रानबांबुळी गावाचा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीत समावेश नको…

ग्रामसभेत एकमताने ठराव: विविध विकास कामांवर झाली चर्चा.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता ७-: जिल्हा मुख्यालयासह धरण आणि रेल्वेसाठी सर्वाधिक जागा रानबांबुळी गावाचीच संपादित झाली आहे. त्यामुळे रानबांबुळी गावाचा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायती मध्ये समावेश न करता ऐतिहासिक वारसा असलेल्या रानबांबुळी गाव वगळून सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत करा.तसेच ७७ हेक्टर क्षेत्रातील विकसीत झोन वगळावा, रानबाबुळी गावाचा नगरपंचायत मध्ये समावेश करण्यास आमचा…

Read Full News

You cannot copy content of this page