⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला तालुक्यात होळी उत्सवाला प्रारंभ झाला असून सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आंब्याची व सुपारीच्या झाडाची म्हणजेच पोफळीची होळी घालण्यात आली. तर मंगळवारी विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमीही साजरी करण्यात आली.
कोकणात गणेश चतुर्थीप्रमाणेच होळीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सोमवारी सायंकाळी 7 वा. नंतर होळी उत्सवाला प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात आंब्याच्या, पोफळीच्या होळी नाचवत नाचवत मांडावर आणण्यात आली. तेथे पूजन करुन गा-हाणे करण्यात आले. वेंगुर्ला शहरात सोमवारी रात्री दाभोसवाडा, विठ्ठलवाडी, गिरपवाडा, भुजनाकवाडी, कलानगर, पूर्वस मंदिर, होळकर मंदिर, दत्तमंदिर, सुंदर भाटले याठिकाणी तर बुधवारी सकाळी कुबलवाडा याठिकाणी होळी घालण्यात आली. या उत्सवात अबालवृद्धांनी सहभाग घेऊन होळी उत्सवाचा आनंद लुटला.ग्रामीण भागातही होळी सण उत्साहात साजरा झाला.
वेंगुर्ला शहर व तालुक्यात होळीचे उत्साहात पूजन…
