Headlines

मराठीच्या संवर्धनासाठी मराठीतून संवाद साधुया…

मेघना जोशी: मराठी विषय आवड निर्माण होण्यासाठी जेथे तुम्हाला मराठी शब्द वाक्य दिसतील त्याचे वचन होणे गरजेचे..

⚡मालवण ता.०३-:
मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी दैनंदिन जीवनात मराठी भाषेमधून संवाद साधने गरजेचे आहे. त्याचबरोबर बोलीभाषा देखील निर्धास्तपणे बोलल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका मेघना जोशी यांनी डीएड कॉलेज मालवण येथे आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात बोलताना केले.

मालवण येथील डीएड कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला. याप्रसंगी डीएड कॉलेज मालवणच्या प्राध्यापक सौ. पूर्वा शिरसाट, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी, सौ. वैशाली चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पूर्वा शिरसाट यांनी केले.

यावेळी बोलताना मेघना जोशी म्हणाल्या, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषेचा जन्म झाला. भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार एकमेकांपर्यंत पोहोचवतो. मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. त्यामध्ये पालकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. पालकांनी आपल्या मुलांशी मराठीतून संवाद साधने गरजेचे आहे. मराठी विषयी आवड निर्माण होण्यासाठी जेथे तुम्हाला मराठी शब्द, वाक्य दिसतील त्यांचे वाचन होणे गरजेचे आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांमधून प्रतिक्षा माधव, ऐश्वर्या धुरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले. आभार दिशा चव्हाण यांनी मांनले.

You cannot copy content of this page