सावंतवाडीत लवकरच आयुष हॉस्पिटलची ओपीडी सुरू होणार..

आमदार दीपक केसरकर यांची धारगळ येथे बैठक संपन्न

⚡सावंतवाडी ता.०३-:
सावंतवाडी येथे आयुष मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या आयुर्वेद संस्था धारगळ गोवा यांच्या माध्यमातून आयुष हॉस्पिटलची ओपीडी सुरू करण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज धारगळ (गोवा) येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत सावंतवाडी शहरात आयुष हॉस्पिटलची ओपीडी लवकरात लवकर सुरू करण्याबाबत तत्त्वतः सहमती दर्शविण्यात आली.

स्थानिक नागरिकांना आयुर्वेद व पारंपरिक उपचार पद्धतींचा लाभ मिळावा, तसेच गोवा येथील आयुर्वेद संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा सावंतवाडीतील रुग्णांना उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले.

ओपीडी सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही, जागेची उपलब्धता तसेच इतर तांत्रिक बाबींमध्ये पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. संबंधित विभागाकडून लवकरच पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असून, सावंतवाडीकरांना आयुष सेवांचा लाभ मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page