मळेवाड येथे डंपर व दुचाकीत अपघात…

⚡सावंतवाडी ता.०४-: मळेवाड प्राथमिक शाळे जवळ मायनिंग वाहतूक करणारा डंपर व गोव्यात कामानिमित जाणारे दुचाकी स्वार यांच्यात धडक होत अपघात झाला.मात्र केवळ दैवबलवत्तर म्हणून या अपघातात ही दोघे दुचाकी स्वार थोडक्यात बचावले.मात्र दुचाकी गाडी चे मोठे नुकसान झाले आहे.

चिन्मय रवींद्र पेडणेकर ( २१ ) रा.होडावडे ( सुभाषवाडी ) संकेत अशोक घोगळे (३६ ) हे दोघे होडावडे वरून कामानिमित्त गोव्याच्या दिशेने जाताना आज सकाळच्या सुमारास मळेवाड प्राथमिक शाळा जवळील वळणावर मायनिंग वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकी स्वार यांच्यात जोरदार धडक झाली.यात दोन्ही दुचाकी स्वार जखमी झाले असून केवळ दैवबलवत्तर म्हणून बालबाल बचावले. दोघांनाही मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून डॉ.विक्रम मस्के यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे पाठविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page