अंधारी बागायतकर कंपाउंडमध्ये माड कोसळून विद्युत पोल पडला..

तात्काळ दुरुस्तीमुळे वीजपुरवठा सुरळीत..

⚡मालवण ता.०३-:
मालवण वायरी येथील अंधारी बागायतकर कंपाउंड या ठिकाणी माड पडून विद्युत वाहिनी तुटून विद्युत पोलही पडला होता. याबाबत नागरिकांनी नगरसेवक तपस्वी मयेकर यांना याबाबत माहिती दिल्यावर मयेकर यांनी वीज विभागाचे लक्ष वेधल्यावर विद्युत कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी नवीन पोल उभारून विद्युत पुरवठा सुरळीत केला. याबाबत नागरिकांनी नगरसेवक श्री. मयेकर तसेच वीज कर्मचारी श्री. गावडे, अक्षय यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page