बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्याकडून विकास कामांची पाहणी…

⚡मालवण ता.०३-:
मालवण शहरातील मेढा येथे मुरलीधर मंदिर ते राम मंदिर या मार्गांवर काँक्रीट गटार बांधकामाचे काम सुरू आहे. बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी या ठिकाणी पाहणी करून दर्जेदार कामाबाबत बांधकाम प्रशासनास सूचना दिल्या.

नागरिकांना सेवा सुविधा मिळण्याच्या दृष्टीने होत असलेली विकास कामे ही दर्जेदार पद्धतीनेच झाली पाहिजेत. कामात कुठलीच तडजोड असता नये. हीच आपली भुमिका आहे. त्या दृष्टीने होत असलेल्या विकास कामांच्या ठिकाणी पाहणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बांधकाम समिती सदस्य नगरसेवक मंदार ओरसकर, नगरपरिषद कर्मचारी राजा केरीपाळे यांसह बांधकाम कामगार उपस्थित होते.

You cannot copy content of this page