दीड दिवसाच्या शिमगोत्सवाची सांगता..
⚡कुडाळ ता.०३-: कुडाळ मध्ये आज मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. सकाळपासून शहरात धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. काल सोमवार पासून सर्वत्र मोठ्या शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी धुळवड मोठ्य उत्साहात साजरी करण्यात आली.
कुडाळ शहरात ठिकठिकाणी सप्तरंगांची उधळण करीत शहरवासियांनी धुळवडीचा आनंद लुटला. शहरात दुपारपर्यंत रंग खेळण्याचा मोठा उत्साह सुरू होता. जिजामाता चौकात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रंगपंचमी साजरी केली. दरम्यान शहरातील दिड दिवसाच्या शिमगोत्सवाची रंगपंचमीसह धुळवडीने दुपारी सांगता झाली. असे असले तरी रात्री उशिरापर्यंत राधा नृत्य घरोघरी जाऊन सादर करण्यात कलाकार गर्क होते.
