⚡मालवण ता.०२-:
मालवण दांडी किनाऱ्यावरील मासळी लिलाव होणाऱ्या ठिकाणी असलेला बंद स्थितीतील हायमास्ट टॉवर मालवण नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांच्या प्रयत्नातून दुरुस्त करून प्रकाशमान झाल्याने रात्रौच्यावेळी हा परिसर उजळून निघाला आहे .
मालवण किनाऱ्यावर दांडी आवार येथे मासळी लिलाव होणाऱ्या ठिकाणी असलेला हायमास्ट टॉवर गेले अनेक दिवस बंद असल्याने मत्स्य व्यावसायिक व मच्छिमार तसेच बीच वर येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती रात्रौच्यावेळी याठिकाणी काळोखातच मच्छि लिलाव तसेच मच्छि खरेदी विक्री करणे अडचणीचे ठरत असल्याने आपली होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्थानिक नागरिक तसेच मत्स्य व्यावसायिक व मच्छिमार यांनी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांचे लक्ष वेधले. या गैरसोयीची सौ. आचरेकर यांनी तात्काळ दखल घेत वायरमन श्री. देऊलकर व श्री बांदेकर यांच्या मार्फत स्वखर्चाने या हायमास्ट टॉवरची तात्काळ दुरुस्ती करून घेत प्रकाशमान केला. यामुळे गैरसोय दूर होऊन मासळी लिलाव करणे सुलभ बनले आहे. तात्काळ दखल घेऊन गैरसोय दूर केल्याबद्दल मत्स्य व्यवसायिकानी नगरसेविका सौ. आचरेकर यांचे आभार मानले, तसेच सकाळीच तत्परतेने दाखल होत टॉवरची दुरुस्ती केल्याबद्दल वायरमन देऊलकर व श्री बांदेकर यांचेही आभार मानले आहेत.
