दिव्य ज्योती च्या पूर्वी गवसचे राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश…

⚡बांदा ता.०२-: डेगवे येथील दिव्य ज्योती स्कूलची विद्यार्थिनी पूर्वी महादेव गावस हिने शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पुणे येथे झालेल्या प्रोअॅक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. देशभरातून सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामधून पूर्वीने १३वा क्रमांक मिळवत आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले.
पूर्वी ही एकलव्य प्रोअॅक्टिव्ह अबॅकस, बांदा येथे प्रशिक्षण घेत असून तिने प्रोअॅक्टिव्ह अबॅकस लेव्हल १ मध्येही प्रावीण्य मिळवले आहे. पुणे येथे आयोजित या स्पर्धेत तिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पूर्वीच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच पालकांनी आनंद व्यक्त केला असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या मेहनतीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.

You cannot copy content of this page